Disha Shakti

कृषी विषयी

भविष्य निर्वाह निधी संदर्भात उत्कृष्ट काम करणारे महात्मा फुले कृषि विद्यापीठ भविष्यात एक रोल मॉडेल बनेल – कुलसचिव श्री. अरुण आनंदकर

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर.आर. जाधव : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कंत्राटी मजुरांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत येणार्या सर्व प्रकारच्या अडचणींवर मार्ग काढण्यात येईल. भविष्यात या कंत्राटी मजुरांच्या भविष्य निर्वाह निधी संदर्भात सर्व त्रुटी दूर करण्यात येतील. असे काम करणारे महात्मा फुले कृषि विद्यापीठ कंत्राटी कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत उत्कृष्ट काम करणारे एक रोल मॉडेल बनेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलसचिव श्री. अरुण आनंदकर यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे अहमदनगर येथील प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त कार्यालयाच्या वतीने निधी आपके निकट-2.0 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. अरुण आनंदकर बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कामगार कल्याण अधिकारी डॉ. नितीन उगले, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त कार्यालयातील प्रवर्तन अधिकारी श्री. गोपाळ मधे, अनुभाग पर्यवेक्षक श्री. पंकज कुमार, सामाजिक सुरक्षा सहाय्यक श्री. सचिन लांडे व राज्य कर्मचारी विमा सहाय्यक श्री. विशाल गायकवाड उपस्थित होते.

यावेळी कंत्राटी मजुरांना व कंत्राटदार यांना येणार्या विविध समस्या तसेच कंत्राटी मजुरांच्या अडीअडचणी, शंका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केवायसी करण्यासंदर्भात तसेच भविष्य निर्वाह निधीसंबंधी येणार्या अडचणी कंत्राटी मजुरांना तसेच कंत्राटदारांना समजावून सांगण्यात आल्या तसेच त्यावर सखोल असे मार्गदर्शन अधिकार्यांकडून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कामगार कल्याण अधिकारी कार्यालयातील श्री. दादासाहेब कोहकडे, श्री. बाळासाहेब मंडलिक यांचे सहकार्य लाभले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!