नगर प्रतिनिधी / कुणाल चव्हाण : संभाजीनगर रोड वरील पोखर्डी गावामध्ये 2015 साली लहान मुलांनी हनुमान चालीसा पठण केंद्र सुरू केले होते या कार्यक्रमास शनिवार दिनांक 16/09/2023 रोजी 8 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून देवगड देवस्थान अध्यक्ष प. पू. गुरुवर्य आदरणीय भास्करगिरी महाराज, मार्गदर्शक ह.भ.प. महादेव महाराज कोरे, मा.आ. कर्डिले साहेब यांची उपस्थिती लाभली होती.
यावेळी महाराजांनी बोलताना हनुमान चालीसा मित्र मंडळाचे भरभरून कौतुक केले. यामध्ये मंडळाकडून झालेले हनुमान मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाचे तसेच मंडळाकडून झालेले कामाबद्दल बोलताना महाराज म्हणाले की आपण सर्वांनी गाईचे महत्व समजून घेवून गाईचे संरक्षण केले पाहिजे. हनुमान चालीसा मित्र मंडळाकडून दर शनिवारी हनुमान चालीसा पठण व व हनुमान जी ची नित्यसेवा सुरू आहे. तसेच या हनुमान चालीसा मित्र मंडळाचा गाव तेथे हनुमान चालीसा सुरू करण्याचा मानस आहे.त्याबद्दल गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावकरी व पंचक्रोशीतील माणसे ही उपस्थित होते.
पोखर्डी गावात हनुमान चालीसा पठण ला 8 वर्ष झाल्याबद्दल आनंदोत्सव कार्यक्रम सोहळा संपन्न

0Share
Leave a reply