Disha Shakti

Uncategorized

देगलूर शहरातील मोडकळीस आलेल्या पोलिस वसाहतीचे नविन बांधकाम करा-गृहमंत्री यांच्या कडे धनाजी जोशी यांची मागणी….

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : नांदेड जिल्हातील सर्वात मोठा तालुका म्हणुन परिचीत असलेले उपजिल्हा देगलूर शहरात जवळपास एक लाख लोकसंख्या असुन,येथिल देगलूर पोलिस स्टेशन मध्ये 100 च्या आसपास पोलिस कर्मचारि असुन त्याच पोलिस बांधवांची पोलिस वसाहतच सुरक्षीत नसुन त्या पोलिस वसाहतीमध्ये सापाचां, डुकरांचा व अनेक जनावरांचा त्याठिकाणीं वावर वाढला असुन, पावसाळ्यातील पाणी पाण्यात पत्रातुन पाणी पोलिस वसाहतीतील घरामध्ये पडत असते

त्यामुळे जे पोलिस बांधव हे देगलुर शहरातील नागरीकांची सेवा करतात त्याच पोलीस बांधवाची वसाहत ही मोडकळीस अली असुन त्यांना सुरक्षा कोण देणार याकरीता राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी साहेब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांना पत्र पाठवुन याविषयावर गांभिर्याने लक्ष देऊन तात्काळ देगलुर पोलीस वसाहतच्या नविन बांधकामासाठी ठोस पाउले उचलुन नविन बांधकामासाठी मंजुरी देऊन उपकृत करावें अशी मागणी गृहमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांना राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!