श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे भोई समाजातील बालवाडीत शिकणा-या मुलीवर शाळेतील स्वच्छता गृहात झालेल्या अत्याचाराप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यासाठी नाऊर येथील श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील कहार समाजाच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजीरवाणी वाटावी अशी घटना पुन्हा घडली आहे. बदलापूर येथील शाळकरी मुलींच्या अत्याचाराची बातमी ताजी असतांना सोनपेठ, जि.परभणी येथे आमच्या कष्टकरी, गरीब, भटक्या, मच्छीमारी करणा-या भोई समाजातील बालवाडीत शिकणा-या मुलीवर दि.५-१०-२०२४ शाळेतील स्वच्छता गृहात सोनपेठ येथील नराधम आरोपीने अत्याचार केला असून सदरील आरोपी आजतागायत फ़रार असून पोलिसांनी अजूनही आरोपीस अटक केलेली नाही, त्यामुळे सदरील प्रकरणात पोलिसांची भुमिका संशयास्पद वाटत आहे.
बालवाडीत शिकणा-या चिमुरडीवर अत्याचार करणा-या नराधम अजूनही मोकाट फिरत असून सदरील आरोपीस तातडीने अटक करुन जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून नराधमास फाशीची शिक्षा मिळेल अशी कायदेशीर कार्यवाही करावी, असे न केल्यास कहार, भोई, भिल्ल आणि समस्त मच्छीमार समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घेवून सदरील आरोपीवर तातडीने कायदेशी कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.
परभणी येथील भोई समाजातील बालवाडीत शिकणा-या मुलीवर अत्याचाराप्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यासाठी कहार समाजाचे तहसीलदार यांना निवेदन

0Share
Leave a reply