इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज खडकी येथे नवरात्र उत्सवानिमित्त नृत्य स्पर्धा व महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजू गायकवाड सर , सचिव ऋषिकेश सर, खजिनदार काळे सर, उपाध्यक्ष तेजस गायकवाड सर, प्राचार्य बाबू सांगळे सर उपस्थित होते. प्रथम नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या ज्यामध्ये पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट नृत्य कलेचे सादरीकरण केले.
या स्पर्धेत पारंपारिक ,आधुनिक व लोकनृत्य अशा विविध नृत्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मेहनतीने, कल्पकतेने सर्वांना मंत्रमुग्ध केले.या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, स्टेजवरील धाडस वाढणे, एकजूट व प्रतिस्पर्धी या भावना निर्माण करणे हा होता. त्यानंतर महाभोंडल्यातही सर्व विद्यार्थी व शिक्षिका यांनी सहभागी होऊन गरबा, दांडीया व नृत्याचा आनंद घेतला. शाळेचे मुख्याध्यापक सांगळे सर व शिक्षिका बालगुडे मॅडम यांनी महाभोंडल्याचे महत्त्व ,भारतीय संस्कृतीतील एकता याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. प्री -प्रायमरीच्या छोट्या चिमुकल्यांनीही या महभोंडल्याचा आनंद घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली.
Leave a reply