नांदेड प्रतिनिधी / मिलींद बच्छाव : नायगाव तालुक्यातील बळेगाव येथील बौद्ध विहाराची जागा अनेक वषार्पासून बौद्ध समाजाच्या ताब्यात होती परंतु सरपंच, ग्राम सदस्य व ग्रामसेवक व्ही.एन.कानगुले यांनी मालमत्ता कर रजिस्टर ला खडाखोड करून अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या नावावर जागा करून दिलं आहे, नायगाव न्यायालयाचा मनाई हुकूम असताना सुद्धा न्यायालयाच्या अवमान करून सदरील जागेवर टीन टाकून अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास ही जागा बेकायदेशीर दिल्याबद्दल बळेगाव येथील बौद्ध समाजाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी साहेबांच्या निवेदन देऊन जिल्हा कचेरीसमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.
या संदर्भात तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक नायगाव इत्यादी अधिकाऱ्याकडे तक्रार सुद्धा दिले असून त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून शेवटचा पर्याय म्हणून अमर उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिनांक ७ पासून उपोषणाची सुरुवात झालेली आहे. यात प्रबुद्ध गायकवाड, देविदास गायकवाड, विश्वंभर गायकवाड, रानबा गायकवाड, संजय गायकवाड, संदेश गायकवाड, बाबासाहेब वाघमारे, राहुल गायकवाड, मारोती सोनकांबळे, साईनाथ गायकवाड, रंजीत गायकवाड, संतोष वाघमारे, रंजीत गायकवाड, मारोती गायकवाड सिद्धार्थ गायकवाड, बालाजी गायकवाड आदि अन्यायग्रस्त व्यक्ती उपोषणास बसले आहेत बेकायदेशीर अण्णाभाऊ साठे स्मारकास दिलेली जागा व टाकलेले टीम काढून टाकण्यात यावे असे गावातील व परिसरातील बौद्ध समाजाचे मागणी आहे.
Leave a reply