राहुरी प्रतिनीधी / आर. आर. जाधव : राहुरी फॅक्टरी परिसरात नगर – मनमाड महामार्गवर हॉटेल वने पाटील समोर धावत्या ट्रक मधून पडून एका ऊसतोड कामगाराचा नुकताच मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरपूर वरून कराड येथील साखर कारखान्यात ऊसतोड कामगारांना घेऊन जात असलेला (एमएच १८ एसी ९९६६) क्रमांक ट्रक काल बुधवारी पहाटेच्या सुमारास राहुरी फॅक्टरी परिसरातून जात होता. तेव्हा राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल वणे पाटील समोर ऊस तोडणी कामगार भारत शिवदास भिल (वय २५, रा. शिंगवे, ता. शिरपूर, जि. धुळे) हा धावत्या ट्रकमधून खाली पडल्याने त्याचा जागेवर मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Leave a reply