राहुरी प्रतिनिधी / आर.आर.जाधव : राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली काम करणारा रशीद पठाण हा ३५ वर्षीय तरुण गाळ्याच्या छतावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटेच्या दरम्यान घडली. रशीद पठाण याचा घातपात झाला कि अपघात याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.
रशीद शरीफ पठाण, वय ३५ वर्षे, रा. तमनर आखाडा, ता. राहुरी, हा तरुण राहुरी येथील बाजार समितीमध्ये हमालीचे काम करत होता. आज दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ४.२० वाजता तो बाजार समितीमध्ये असलेल्या एका गाळ्याच्या छतावरून खाली पडला. छताची उंची सुमारे १५ फूटच्या आसपास आहे. त्याचवेळी एक इसम तेथून मोटारसायकल चालू करुन निघून गेला. सदर प्रकार हा तेथे असलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद झालाय. रशीद पठाण हा गाळ्याच्या छतावर कशासाठी गेला होता. त्याच्या बरोबर आणखी कोण होते. तो पडला कि त्याला कोणी ढकलून दिले. सदर प्रकार हा घातपात आहे कि अपघात, या बाबत तालूक्यात विविध चर्चेला उधाण आले आहे.
मयत रशीद पठाण याचे सकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आजी आजोबा, आई वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्याच्या निधनाने हमाल, मापाडी वर्गातून तसेच तमनर आखाडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटने बाबत सध्या राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विजय नवले हे करीत आहे.
HomeUncategorizedराहुरी बाजार समितीमध्ये हमाली करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाचा गाळ्याच्या छतावरून पडून मृत्यू, अपघात की घातपात चर्चेला उधाण ❓
राहुरी बाजार समितीमध्ये हमाली करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाचा गाळ्याच्या छतावरून पडून मृत्यू, अपघात की घातपात चर्चेला उधाण ❓

0Share