Disha Shakti

अपघात

श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथे रोटावेटरमध्ये पँट अडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : रोटावेटरमध्ये पॅण्ट अडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथे घडली. दिलीप आण्णासाहेब कहांडळ  (वय ५०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिलीप कहांडळ हे रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास कांदा लागणीसाठी रोटावेटरने शेत जमीन तयार करीत होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्य ट्रॅक्टर चालवित होते. यावेळी रोटावेटरमध्ये पॅण्ट अडकल्याने दिलीप कहांडळ यांचा पाय रोटावेटरमध्ये ओढला गेला. ट्रॅक्टर बंद करेपर्यंत मांडीपर्यंत पाय रोटावेटरमध्ये ओढला गेला. गंभीर जखमी अवस्थेत नातेवाइकांनी श्रीरामपूर येथे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच निधन झाल्याचे घोषित केले. या घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!