Disha Shakti

Uncategorized

पोहडूळ ग्रामपंचायतच्या कामात भ्रष्टाचार ? पोहडूळ ग्रामपंचायची चौकशी करून कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी

Spread the love

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : महागाव पंचायत समिती प्रशासनाचा कारभार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यात नव्या गटविकास अधिकाऱ्याच्या जगावेगळ्या कारभाराची भर पडली आहे. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामातील भ्रष्ट्राचार व सरपंच सचिवाच्या मनमानी कारभाराची तक्रार घेऊन पंस कार्यालयात नागरिक गेले तर गैरव्यवहाराचा तुमच्याकडे पुरावा आहे काय असा उफराटा प्रश्न बीडीओ कडून तक्रारकर्त्या नागरिकालाच विचारण्यात येतो. भ्रष्टाचाराचे पुरावे तक्रारदारांनाच आणून द्यावे लागत असतील तर गटविकास अधिकारी पगार कशाचा घेत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक वेळा बिडिओ कडे तक्रादारांनी ताकारी करून सुद्धा कुठेलीही कारवाही का करण्यात आली नाही. याकडे आता गवऱ्यांचे लक्ष वेधले आहे कधी कार्यवाही होईल की, नाही. महागाव पंचायत समिती प्रशासनात एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही. गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांचे प्रशासनावर नियंत्रण नाही. पोहंडूळ येथील सरपंच आणि सचिवाच्या बोगस कारभाराची तक्रार दस्तुरखुद्य विनोद जगताप, गजानन खापरकर, मगलाबाई मस्के व सिंधुबाई चव्हाण या चार ग्रामपंचात सदस्यांनी बीडीओ ज्ञानेश्वर टाकरस यांच्याकडे दिली. मसिक सभेला सरपंच हजर राहात नाहीत, सरपंच व सचिव सातत्याने सभागृहात गैरहजर असतात, प्रोसिडिंग वर सत्ताधारी सदस्यांच्या घरी जाऊन सह्या घेतल्या जातात, सदस्यांना विश्वासात न घेता विकासकामे केली जातात, कोविड काळात फवारणी न करताच निधीचा अपव्यव करण्यात आला , तसेच प्रत्येक कामात प्रचंड अनियमितता असल्याच्या गंभीर तक्रारी सदस्यांनी केल्या. या वर अदयापही कुठली ही कार्यवाही नाही. यावर तुमच्याकडे पुरावे काय असा उलट प्रश्न बीडीओंनी केला. त्यांनी ग्राप सदस्यांनाच पुरावे सादर करण्याचे फर्मान सोडले. बीडीओ च्या या वागणुकीमुळे गावकरी प्रचंड संतापले आहेत.

विकास कामातील भ्रष्टाचारात सचिवासह बीडोओचा सुद्धा सहभाग आहे काय अशी शंका गावकरी व्यक्त करीत असून या एकुणच अंधाधुंद कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. व चौकशी करून भ्रष्ट सरपंच दिनेश रावते वर कार्यवाही करण्याची मांगणी गावकरी कारीत आहे. याकडे जिल्हा अधिकारी यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन सरपंच यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा कार्यवाही न झाल्यास उपोषण करण्यात येईल असा ग्रामस्थांनी इशारा केला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!