नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ मिलींद बच्छाव : तालुक्यातील नरसी येथील ग्रामदैवत धुरपतमाय गावदेवी मंदिराचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. दि. २३ डिसेंबर २०२४ रोज सोमवारी सकाळी १० वाजता या मंदिरात धुरपतमायची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा छोटीबाई साईनाथ गुरुपवार मानकरीन महाकाली मंदिर चंद्रपुर यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.या कार्यक्रमाला गावातील सर्व नागकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे.
गावकऱ्यांच्या वतीने दि २२ डिसेंबर रोज रविवारी दुपारी ४ वाजता आळंक्या काढण्यात आल्या. गावातील महिलांनी आपल्या घरून प्रत्येकी एक आळंका आणल्या होत्या. मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा नरसी जुने गाव येथे सोमवारी सकाळी १० वाजता धुरपतामाय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळस बसविण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर लगेचच सर्व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.
या वेळी नरसी चे सरपंच गजानन भिलवंडे, कांग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पा. भिलवंडे , शिवसेना ता. अध्यक्ष रवींद्र पा. भिलवंडे, पोलीस पाटील इब्राईम बेग पटेल, लालबा मेकाले,संभाजी मिसे,गोविंद नरसीकर,मारोती बुके, खाकीबा सूर्यवंसी,गणेश कंदुरके, आदिजन उपस्थितीत होते.
Leave a reply