नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलींद बच्छाव : नायगाव तालुक्यातील कुंचेली येथील मुस्लीम समाजाच्या पुढाऱ्यांनी कोणतीही परवानगी न घेता शासकिय गायरान जमिन गट क्रं.१६६ वर अतिक्रमण करून बांधकाम करीत असताना गावातील नवतरुण सामाजिक कार्यकर्ते व समस्त गावकरी मंडळी बांधकामाबदल चौकशी केली असता मुस्लीम समाजाच्या दफणभुमीसाठी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे शासकिय जमिन गट क्रं.१६६ चे क्षेत्र ४० आर ची मागणी दि.२० डिसेंबर २०२३ रोजी केली असल्याचे व परवानगी मिळाली म्हणून सांगत असता त्याबद्दल सखोल चौकशी केली असता मा.तहसिलदार नायगाव यांनी अपुर्ण कागदपत्रे असल्याचे पत्र असुन पुर्तता करण्याचे पत्र दिले आहे. त्यांची पुर्तता न करता अतिक्रमण करून बांधकाम करीत असताना गावकऱ्यांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी, सहपोलीस निरिक्षक रामतिर्थ, ग्रामसेवक, सरपंच,तलाठी, उपविभागीय अधिकारी बिलोली येथे अनेक निवेदन देऊन पाठपुरावा केल्यानंतर वरील अधिकारी स्थळ पंचनामा करून काम थाबविण्याचे आदेश देऊन सुद्धा बरेचशे काम केले आहे. या समाजाने पूर्वी दोन ठिकाणी अतिक्रमण मोक्याच्या जागी केले आहे.
आमच्या गावाच्या गुरा ढोराचा, शेळ्या, मेंढ्या,गाढव
चरईसाठी गायरांनचा ऊपोयोग सध्या केला जात आहे.तसेच गावात अनेक समाज असुन एकाहि समाजासाठी स्मशान भूमीसाठी जागा दिली नसल्यामुळे अनेक समाज शासकिय गायरान जागेवर अंत्यसंस्कार केल्या जात आहे.तरी जागेवर अतिक्रमण होत असेल तर बाकी समाजाचा विचार केला जावा, एका समाजालाच न देता मुक्या जनावरांचा, विचार करावा, व गावातील सर्व समाजाला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक समाजासाठी स्मशानभूमीसाठी जागा ऊपलब्ध करून द्यावी.गावातील विकास निधी गायरांन व अतिक्रमण केलेल्या समाजासाठी बांधकाम होत असलेल्या जागी सरपंच, ग्रामसेवक यांनी कोणत्या आधारे विकास निधी खर्च केला त्यांची कसुन चौकशी स्थळ पाहणी करुन काम न करण्याचे आदेश असताना सरपंच त्याठिकाणी काम करीत आहे. त्यांची त्वरीत दखल घेऊन संबंधितांवर योग्य ते कार्यवाही करावी.गावात होत असलेला तणाव त्वरीत शांत करून गावात जातीतील सलोखा कायम राहावा म्हणून तहसीलदार, गटविकास अधिकारी,तलाठी, सहपोलीस निरिक्षक, ग्रामसेवक,यांना निवेदन देऊन त्वरीत अर्जाची दखल घेऊन चौकशी करून संबंधितांस पावबंध करून होत असलेलेले बांधकाम त्वरीत बंद करावे. निवेदनाची दखल न घेतल्यास गावात जाती जातीत तणाव तेढ निर्माण झाल्यास यांची सर्व जबाबदारी शासन प्रशासन यांची राहिलं अशी वेळ गावकऱ्यांवर येऊ देऊ नये असे निवेदन, सामाजिक कार्यकर्ते नागेश मोरचोडे, ज्ञानेश्वर शिंपाळे, शिवराज भुरे.जयराज बोधणे, संतोष शिंपाळे,दत्ता बोधणे, पंढरी डाकोरे, बालाजी जाधव, श्रीनिवास बागे, बाबुराव बोयाळ. बालाजी लालवंडे, विश्वनाथ भुरे, प्रविण डाकोरे.अविनाश शिंपाळे, लक्ष्मण इंगळे, दिलीप मोरचोंडे, विजय व्होनराव, समस्त गावकरी मंडळी कुंचोली. गावकऱ्यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
Leave a reply