विशेष प्रतिनीधी / इनायतअत्तार : जालना येथील ऊसतोड कामगार आबादास तेजराव पैठणे वय 33 वर्ष हे ऊसतोडणी करण्यासाठी राहुरी येथे आले असता दिनांक ते 10/01/2025 रोजी सायकाळी सहाच्या सुमारास नेहमी प्रमाणे ऊस तोडणीचे काम करुन घरी परत येत असतांना जातप चौफुली येथे ऊसाचे वाढे विकुण घरी येतो असे सांगितले परंतु 10 वाजेपर्यंत घरी आले नाही तसेच इतर नातेवाईकांकडे चौकशी करून शोध घेतला असता त्यांचा शोध लागत नसल्याने त्यांची पत्नी भारती आबादास पैठणे यांनी आपल्या पतीची राहुरी पोलीस स्टेशनला हजर होवुन मिसिंगची तक्रार दाखल केली आह़े.
1) मिसिंग व्यक्तीचे नाव आबादास तेजराव पैठणे वय 33 वर्ष रा. लाख जालपगाव सा.राहुरी जि. अहिल्यानगर वर्णन शरिराने सडपातळ उंची 5 फुट 5 इंच, रंग गोरा, चेहरा उभट, केस काळे अंगात पॅन्ट शर्ट, दाढी वाढलेली असे वर्णन आह़े.
राहुरी येथून ऊसतोड कामगार बेपत्ता ; पत्नीकडून राहुरी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल

0Share
Leave a reply