विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील नांदूरपठार येथील ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ११ दिवस महाराष्ट्रातील नामवंत किर्तकरांच्या किर्तन सेवेचे आयोजन केले असून ११ दिवस दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सुवर्णमहोत्सव निमित्त भागवताचार्य प्रेमानंद शास्त्री आंबेकर महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथेचेही आयोजन करण्यात आले आहे.
सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून दत्तमंदिर, श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर व मुक्ताताईमाता मंदिरांमध्ये मूर्ती स्थापना व कलशारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दि. ३० रोजी सायंकाळी ५ वाजता कलश व श्री. मुर्तींचे मिरवणूक काढण्यात आली होती. शुक्रवार दि. ३१ रोजी सकाळी ६.३० ते दुपारी ११ वाजेपर्यंत मुर्ती स्थापना विधी, गणेश पूजा,मातृका पूजन, योगिनी पूजन,वास्तू पूजन, नांदी श्राद्ध, क्षेत्रपाल पूजन, मुख्य पूजन, रुद्र पूजन, ब्राह्मण पूजन, नवग्रहण पूजन, पुर्णाहुती असे विविध विधी पार पडल्यानंतर दुपारी एक वाजता तुळशीराम महाराज सरकटे, जनार्दन महाराज मुंढे व प्रेमानंद महाराज आंबेकर यांच्या हस्ते मुर्ती स्थापन व कलशारोहण सोहळा संपन्न झाला. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची हजेरी
शुक्रवार दि. ३१ रोजी स्वरभास्कर बाळासाहेब महाराज रंजाळे श्रीरामपूर, शनिवार दि. १ किर्तन केसरी अक्रुर महाराज साखरे गेवराई बीड, रविवार दि.२ विनोदाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे जेऊर हैबती, नेवासा, सोमवार दि.३ अनिल महाराज पाटील बार्शी धाराशिव, मंगळवार दि. ४ संजयनाना धोंगडे महाराज,नाशिक, बुधवार दि.५ पांडुरंग महाराज घुले श्रीक्षेत्र देहू , गुरुवार दि.६ ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली आळंदी देवाची, शुक्रवार दि. ७ एकनाथ महाराज चत्तर शास्त्री कान्हुरपठार, शनिवार दि.८ पुंडलिक महाराज जंगले शास्त्री डोंगरगण नगर, रविवार दि.९ धर्माचार्य अमृता आश्रम स्वामी महाराज राजूरी बीड, सोमवार दि. १० उमेश महाराज दशरथे परभणी या नामवंत किर्तनकारांची किर्तन सेवा असणार आहे.
नांदूरपठार येथे भव्य किर्तन महोत्सवास प्रारंभ ; भागवताचार्य प्रेमानंद महाराज आंबेकर शास्त्री यांची भागवत कथा

0Share
Leave a reply