Disha Shakti

क्राईम

कोपरगाव येथे आईच बनली वैरीण; अनैतिक संबंधामध्ये अडथळा, पोटच्या लेकाला प्रियकराच्या मदतीने संपवलं

Spread the love

विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : कोपरगाव येथे अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात २० डिसेंबर २०२४ रोजी गोदावरी नदी पात्रात पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर त्या बालकाची आई व तिचा प्रियकर तेव्हांपासून बेपत्ता होता तसेच शवविच्छेदन अहवालात त्या चिमुकल्याची हत्या करून नदी पात्रात फेकल्याचे उघड झाल्यानंतर पोलीसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली. ही हत्या मयताची आई शितल बदादे आणि तिचा प्रियकर सागर वाघ यांनी केल्याचे पोलिस तपासात उघड झालं आहे. अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरत असल्याने निर्दयीपणे चिमुकल्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कोपरगाव पोलिसांनी निर्दयी आई आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची चक्रे फिरवत या हत्येचा छडा लावला आहे. अनैतिक संबंधातून चिमुकल्या मुलाची हत्या झाल्याने मोठी हळहळ  व्यक्त  केली जात असून व तसेच रोष व्यक्त केला जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!