विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : कोपरगाव तालुक्यातील काकडी शिवारात असणार्या दिघे वस्तीवर शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी भोसले कुटुंबावर घरात घुसून वडिल व मुलाची निर्घृण हत्या केली. या मारहाणीत आई गंभीर जखमी आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांच्या तपास पथकांनी तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा करणारे दोन संशयीत इसम टेम्पोमधुन सिन्नर मार्गे नाशिककडे जात असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका, सिन्नर, जि.नाशिक येथे सापळा रचुन संशयीत इसमांचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजुस बसलेले संशयीत दोन इसम मिळून आल्याने संदीप रामदास दहाबाड (वय 18), जगन काशिनाथ किरकिरे (वय 25) दोन्ही रा.तेलीम्बरपाडा, ता.मोखाडा, जि.पालघर अशांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता संदीप रामदास दहावाड याने त्याचे साथीदारासह रात्री 12.30 वा.सुमारास काकडी विमानतळ परिसरामधील एका घरामध्ये जाऊन दोन तीन जणांना लाकडी दांडक्याने व फावडयाने मारहाण केली व चोरी केल्यानंतर पळून जात असलेबाबत माहिती सांगीतली. ताब्यात घेण्यात आरोपी संदीप रामदास दहाबाड व जगन काशिनाथ किरकिरे, रा.तेलीम्बरपाडा, ता.मोखाडा, जि.पालघर यांना गुन्ह्याचे तपासकामी राहाता पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असुन पुढील तपास राहाता पोलीस करीत आहे.
शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी 12 तासांत जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0Share
Leave a reply