सोनई प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे दिनांक २४ मार्च रोजी सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान कौटुंबिक वादातुन पतीनेच आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे घडली. मयत महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून या घटने प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मयताचा पती आप्पासाहेब भागवत ढेरे यास सोनई पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने अटक केली असून. ही घटना सोमवार दि. २४ रोजी सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, दि. २४ रोजी सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान लोहगाव शिवारात असणाऱ्या त्यांच्या राहात्या घरी ढेरे वस्ती येथे फिर्यादी यश आप्पासाहेब ढेरे (वय १९) रा. ढेरे वस्ती, लोहगाव शिवार, हल्ली पाईपलाईन रोड,
अहिल्यानगर यांचे वडील आरोपी आप्पासाहेब भागवत ढेरे, भागवत कुंडलीक ढेरे, संतोष भागवत ढेरे, अर्चना संतोष ढेरे सर्व रा. ढेरे वस्ती लोहगाव शिवार, दीपक सोनवणे (पूर्ण नाव माहीत नाही) रा. सोनई यांनी माझी आई मयत संपदा आप्पासाहेब ढेरे (वय ४७) ही वडिलांना सोडून अहिल्यानगर येथे राहण्यासाठी गेली होती. त्याचा राग येऊन वरील सर्वांनी मिळून कट रचून कुऱ्हाडीने व लाकडी दांड्याने तिच्या डोक्यावर मारहाण केली. तसेच पोटात लाथाबुक्यांनी मारहाण करत जिवे ठार मारले असल्याचे दि. २५ रोजी दाखल असलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. यानुसार गुन्हा र. नं. ९१/२०२५ बिएनएसचे कलम १०३ (१), १८९(२), १९१(२), १९१ (३), ३५२, ३५१(२) ३५१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई सुरज मेढे हे करत आहेत.
नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे पतीनेच केला पत्नीचा खून, पाच जणांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0Share
Leave a reply