राहुरी प्रतिनिधी / आर आर जाधव : राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे विजेचा शॉक बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली ही घटना दि. ५ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे गुरुवार दि. ५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता कुणाल अशोक कांबळे, वय १८ वर्षे हा अविवाहित तरुण त्याच्या घराजवळ पाणी भरत होता. त्यावेळी विजेचा शॉकसर्किट होऊन विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने कुणाल कांबळे याला जबरदस्त शाॅक बसला. त्याच वेळी भारती सनी कांबळे या विवाहित महिलेला देखील विजेचा शॉक बसला.
दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र कुणाल कांबळे या तरुणाचा मृत्यू झाला. तर भारती कांबळे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे तांभेरे परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी

0Share
Leave a reply