राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : खटला पूर्व दाखल प्रकरणे आणि प्रलंबित खटल्याचा जलद निपटारा तसेच खटले सामोपचाराने मिटवावीत या हेतूने शनिवार दिनाक २२ मार्च रोजी राहुरी न्यायालयाच्या आवारात लोक न्यायालयात अनेक खटले निकाली काढण्यात आली आहे. दाखल पूर्व व दाखल अशी एकूण ७६२५ प्रकरणे निकाली काढण्यात काढत ५९,७४,८८० रुपये तडजोडीने वसूल करण्यात आले. अशी माहिती रहिवासी विधी सेवा अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सौ.अनुपमा पारशेट्टी यांनी दिली.
राष्ट्रीय विधी सेवा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे पार पाडण्यात आली होती रहिवासी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सौ . अनुपमा शेट्टी यांच्या मार्गदर्शनात राहुरी येथे लोक न्यायालय निवाडा करण्यासाठी तीन पॅनल करण्यात आले होते.या पॅनलमध्ये एक सौ. अनुपमा पारशेट्टी व पंच एडवोकेट स्वाती आढाव तसेच पॅनल दोनमध्ये सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर रूपाली तापडिया आणि पंच एडवोकेट श्रीमती शेरकर, पॅनल तीन मध्ये तिसरे सह दिवाणी न्यायाधीश आदित्य शिंदे व पंच एडवोकेट विशाल संसारे हे होते.
या लोकन्यायालायत मध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. यामध्ये फौजदारी प्रकरणे, तसेच दाखल पूर्व प्रकरणे, सर्व ग्रामपंचायत खटला पूर्व दाखल प्रकरणे, भारत संचार निगम लिमिटेड, सर्व बँकिंगची खटला पूर्व दाखल प्रकरणे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे खटला पूर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये ७६२५ प्रकरणाचा निपटारा करण्यात आला तसेच ५९ लाख ७४ हजार ८८० रुपये तडजोड रक्कम जमा करण्यात आली. लोकन्यायालयातील सर्वांचे लक्ष एका कुटुंबीयांच्या मनोमिलनाने वेधले ,राहुरी येथील एका कुटुंब त्यांच्या सुखी संसार रममाण होते त्या दाम्पत्याला ३ मुले होती त्यांचा संसार सुखाचा सुरु होता पण नंतर त्यांच्यात वाद होऊ लागले त्या मुळे हे दाम्पत्य गेल्या ५ वर्षापासून विभक्त राहत होते. विवाहिता ही सोनई ,तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे आपल्या माहेरी विभक्त राहत होती तर पती राहुरी येथे विभक्त राहत होता.
गेल्या तीन वर्ष पासून हे दांपत्य हे न्यायालयाचे चकरा मारत होते, आज दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सौ. अनुपमा पारशेट्टी यांच्या पुढाकाराने व त्यांच्या मध्यस्थीने पाच वर्षापासून विभक्त कुटुंब जोडप्याचा लोकन्यायालय मार्फत तडजोड करत मनोमिलन घडवून आणून पुन्हा नव्याने त्यांचा संसार फुलवला . या जोडप्याला तीन अपत्य असल्याने त्या मुलांच्या चेहऱ्यावर देखील आनंद फुलाला न्यायालयातील न्यायाधीश ,वकील व न्यायालयीन कर्मचारी याच या तडजोडीने हायसे वाटले व या जोडप्याने एकत्र आल्याचा आनंद झाला. यावेळी सदर दांपत्याच्या वतीने एडवोकेट भगवान उऱ्हे व सामने वाला यांच्या वतीने पी एस पागिरे यांनी कामकाज पाहिले.या तडजोडीच्या वेळी एडवोकेट मच्छिंद्र देशमुख, एडवोकेट बाळासाहेब बाचकर, एडवोकेट प्रमोद कोळसे, एडवोकेट नानासाहेब तनपुरे हे उपस्थित होते. लोकन्यायालयात झटपट तडजोड झाल्याने अनेक नागरिकांनी याचे कौतुक केले व न्यायालयाच्या चकरा मारण्यपासून होणारा त्रास वाचल्याने अनेक नागरिकांनी याबद्दल न्यायालयाचे आभार मानले.
तसेच लोक अदालतीमध्ये राहुरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऋषिकेश मोरे, उपाध्यक्ष मच्छिंद्र देशमुख, राहुरी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे, उपाध्यक्ष बाळासाहेब बाचकर, एडवोकेट शिवाजी कल्हापुरे, एडवोकेट कारभारी ढोकणे,एडवोकेट अशोक होले, एडवोकेट इंद्रभान काळे, एडवोकेट विवेक तांबे , एडवोकेट विशाल होले, एडवोकेट ऋषिकेश पंडित, ऍडव्होकेट तोफिक बागवान, एडवोकेट अजय पगारे, एडवोकेट पल्लवी कांबळे, एडवोकेट ज्योती राऊत,एडवोकेट सुनिता लहाने आदिंसह बार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर लोकन्यायालय यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे व पंचायती समितीचे गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
न्यायालयीन कर्मचारी प्रशासन अधिकारी पांडुरंग सातपुते, सेवानियंत्रक अधीक्षक सौ जया, सुवर्णा बगाडे, किशोर वडीतके, जावेद शेख, प्रेम खरात, अरुण आल्हाट, श्रीकांत मोरे, शैलेंद्र मोरे, राणी वेताळ, श्री गोरे, वैभव तोटरे,आशा कळमकर, श्रीमती गव्हाणे, श्री घुगासे, वैशाली ससे, दिलीप कुलकर्णी, अमोल पिचड, स्वप्नील शिंदे,रवींद्र हापसे, अंबादास सुसलादे ,युवराज गंड, हर्षद सुतवाणी यांनी सहकार्य केले. न्यायाधीश सौ अनुपमा पारशेट्टी यांनी लोक न्यायालयात तडजोड करून प्रकरणाचा निपटारा घ्या असे आवाहन केले.
राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये विभक्त कुटुंब झाले एकत्र , जोड्यांचा संसार फुलला मुलाच्या आयुष्यात आनंद परतला

0Share
Leave a reply