सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर : सोनई पोलीसांनी सध्या अवैध धंद्याविरुध्द कारवाई चा जणु काही विडाच उचलला आहे. रोज कुठे ना कुठे दारू, मटका या सारख्या परिसरात चालणाऱ्या धंद्याविरुध्द कारवायांचा धडाका लावलेला आहे. घोडेगाव येथील लक्ष्मण काशिनाथ कुऱ्हाडी (वय. ५४) हा आपल्या राहत्या घरी १००० रुपये किंमतीची १० लिटर तयार गावठी दारू विक्री करत असताना आढळून आला. लोहगाव येथेही आदेश नंदु काळे, माका येथे वाघोली रोडवर
अंबादास रामभाऊ लोंढे, सोनई जवळील मुळा कारखाना येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये करण राजेंद्र गुंजाळ, किसन नामदेव बर्डे (वय.४४) हा वाजोंळी रोडवरील वनीकरणामधे विना परवाना देशी विदेशी दारू विक्री करत असताना आढळून आले. त्यांच्याकडून हजारो रुपयांची गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. या पाच कारवायामध्ये ७,०६० रुपये दंडाची कारवाई केली आहे. सर्व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.
Leave a reply