प्रतिनिधी / शिवाजी दवणे : पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) मुख्यालयावर रविवारी सकाळी एका जवानाने गोळीबार केला. या गोळीबारात 4 जवान शहीद झाले असून 2 गंभीर जखमी झाले आहेत. त्याचवेळी स्वत:वर गोळी झाडणाऱ्या जवानानेही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. जखमींवर गुरुनानक देव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर कर्तव्याचा वाद हे गोळीबाराचे कारण सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासा येथील बीएसएफ मुख्यालयाच्या मेसमध्ये 144 बटालियनचे जवान नाष्टा करत होते. यादरम्यान एका जवानाने रागाच्या भरात अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ड्यूटीवरून जवानाला राग आल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारात नाष्टा करत असलेले जवान जखमी झाले. या घटनेनंतर बीएसएफच्या मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
गोळीबार केल्यानंतर कॉन्स्टेबल सत्यप्पाने स्वत:वरही गोळी झाडली. यात चार जवानांचा जागीच मृत्यू झाला. कॉन्स्टेबल सत्यप्पा आणि जखमी जवानाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात प्राथमिक तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी पाच जवानांना मृत घोषित केले. मृतांचे नातेवाईक आणि बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनाही कळवण्यात आले आहे.
अमृतसर कॅम्पमध्ये बीएसएफ जवानाचा सहकाऱ्यांवरती गोळीबार, 5 जण मृत्यूमुखी ; अधिका-यांची माहिती

0Share
Leave a reply