प्रतिनिधी. शिवाजी दवणे : राहुरी-जागतिक महिला दिनाचे अवचित्य साधून राहुरी शहरातील दिव्यांग बंधू व भगिनी साठी ग्रामीण रुग्णालय राहुरी येथे राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने रेल्वे पाससवलत मिळण्यासाठी शिबिर आयोजित केले होते. सदर शिबिरात शहरातील दिव्यांगबंधू व भगिनी सहभाग घेऊन लाभ घेतला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर यांच्या मार्फत मिळालेल्या प्रमाणपत्राच्या आधारे राहुरी ग्रामीण रुग्णालय चे डॉ वैरागर यांनी तपासणी करून रेल्वे पास मिळण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात आले.रेल्वे पास मिळण्याचा अर्ज तीन प्रतित तयार करून श्रीरामपुर येथील रेल्वे स्टेशन वर जमा करण्यात आले .ते अर्ज रेल्वे शाखा प्रभधक मार्फत सोलापूर डीव्हीजन ला पाठवले जाणार आहे .नंतर एक महिन्यात 75% रेल्वे सवलत पास मिळणार आहे .
आजच्या शिबिरासाठी आयोजनपासून नियोजनापर्यंत परिश्रम घेणारे प्रहार जिल्हा समन्वयक अप्पासाहेब ढोकने राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना अध्यक्ष मधुकर घाडगे उपाध्यक्ष विठ्ठल पांडे , तालुका सचिव सचिव योगेश लबडे संपर्क प्रमुख रविंद्र भुजाडी सल्लागार सलीमभाई शेख राहुरी शहराध्यक्ष वैभव थोरात शहरउपाध्यक्ष जालिंदर भोसले,ब्राम्हनी शाखा अध्यक्ष बाबुराव शिंदे सर साहेब महिला अध्यक्षा रुपाली जाधव उपाध्यक्षा छायाताई हारदे, अनामिका हरेल मॅडम ,वैशाली शिंदे, करुणा हापसे, सुनीता झाबरे ,छाया साठे, सुरेखा सांगळे, संगीता धोंगडे, कविता सुर्यवंशी ,इतर सर्वच प्रहार पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार. तसेच सर्व राहुरी तालुक्यात शाखा वाइज रेल्वे पास काढण्याचे शिबिर चे आयोजन करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील दिव्यांगांनी त्यांचा लाभ घ्यावा असे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले
सहभागी दिव्यांग बंधु भगिनींनचे, राहुरी तालुका ग्रामीण रुग्णालय डॉक्टर इतर स्टाफ यांचे देखील आभार. आम्हाला आजच्या या कार्यक्रमास शिस्तबद्ध व नियोजनबद्ध काम करण्यास आपण सर्वांनी मदत केली त्याबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमात दिव्यांगाप्रति वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना फाँर्म देणं भरुन घेणे,केस पेपर काढून देणे झेराँक्ससाठी मार्गदर्शन करणे इ. प्रकारचे अनेक कामे करताना खरच खुपच आनंद वाटला. आणि हा येथेच न थांबता राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेला सर्व तालुक्यातील दिव्यांगांचे टप्प्या टप्प्याने सर्व गावातील दिव्यांगांचे रेल्वेसवलत पाससाठी नियोजन आहे ते करण्यासाठी आपण सर्वांनी अशीच मोलाची मदत सर्व प्रहार सैनिकांना करावी.
Leave a reply