विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर मतदार संघात रस्त्यांच्या कामांचा धडाका सुरु असला तरी कामाचा दर्जा अत्यंत ‘निकृष्ट’ आहे. विकास कामांचा केवळ दिखावा’ सुरु असून रस्त्यांची कामे फक्त पुढारी, अधिकारी व कंत्राटदाराची घरे भरण्यासाठी सुरु असल्याचे दर्जाहीन कामावरून सिद्ध होत आहे.
आमदार लहू कानडेंनी नुकतेच उदघाटन केलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-वळदगाव रस्त्याचेही काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरु आहे. तब्बल ७५ लक्ष रुपये खर्चून होत असलेल्या या रस्त्याच्या बोगस कामाबाबत ग्रामस्थांनीही संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, बेलापूर-वळदगाव रस्त्याच्या कामात उप-अभियंता रविंद्र पिसेंसह रस्त्याच्या कामातील नियुक्त अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतल्याने ठेकेदार बिनदिक्कतपणे दर्जाहीन, निकृष्ट काम करून शासनासह जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप वळदगावचे सरपंच अशोकराव भोसले यांनी केला आहे.
रस्त्याचे काम त्वरित थांबवून कामाचे कार्यारंभ आदेश रद्द करून ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी प्रश्न व तक्रारी मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे .या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ २९ सप्टेंबर रोजी आमदार लहू कानडेंच्या हस्ते झाला होता. दरम्यान, सध्या रस्त्याचे काम सुरु असून रस्त्याच्या कामात सुरुवाती पासूनच अत्यंत निकृष्ट मटेरियलचा वापर होत असल्याने लाखों रुपयांचा निधीने केवळ ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांचे खिशे भरले जात असल्याचे सरपंच अशोकराव भोसले यांनी म्हंटले आहे.
जिल्हा परिषद श्रीरामपूर उपविभागाचे उप-अभियंता रविंद्र पिसे यांसह रस्त्याच्या कामातील नियुक्त अधिकारी उप-अभियंता टक्केवारी घेतल्यानेच ठेकेदाराला मनमानी पद्धतीने, अत्यंत निकृष्ट मटेरियलचा वापर करून काम करू दिले जात असल्याचा आरोप सरपंच अशोकराव भोसले आर पी आयचे अध्यक्ष राजेश अमोलीक माझी सरपंच रामराव शेटे पाटील बेलापूर ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक दिपक अमोलीक विनोद अमोलीक बाबुराव गाडेकर .यांनी केला आहे.
रस्त्याच्या कामात कच्च्या खडीचा वापर केला आहे. डांबराचा वापर अत्यंत कमी केल्याने रस्ता जागीच उखडत आहे. खचत आहे नंतरही खचणार आहे. रस्त्यावरील खडीही हाताने सहज निघत आहे. रस्ता अनेक ठिकाणी खाली-वर असून लेव्हल नाही. रस्त्याची रुंदीमध्ये तफावत असल्याने त्याची तपासणी, मोजमाप केल्यास मोठा घोटाळा उघड होणार असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. रस्त्याच्या बाजुच्या पट्ट्याच्या कामात मोठी अनियमितता आहे. बाजु पट्ट्याचे मोजमाप करावे. साईडपट्ट्याच्या रुंदीमध्येही मोठी तफावत असून बाजुपट्ट्यात मातिमिश्रित मुरामाचा वापर केला असल्याचे म्हंटले आहे.
Leave a reply