राहुरी प्रतिनिधी/ अशोक मंडलिक : राहुरी शहरात खड्डा चुकविताना भुजाडी पेट्रोल पंपा समोर तरुणाचा मृत्यू नगर मनमाड रोड अजून किती बळी घेणार नागरिकांचा सवाल ?
नगर मनमाड रस्त्यावरील राहुरी शहरा लगत असलेले भुजाडी पेट्रोल पंपा समोर काल सायंकाळी पाच वाजता अजय कारभारी बोरुडे वय 28 या तरुणाचा राहुरी शहरातील भोजाडी पेट्रोल पंपा समोर खड्डा चुकविताना अपघात होऊन त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे दरम्यान नगर मनमाड रस्त्याचे काम रखडल्यामुळे पाऊस आल्यानंतर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे भयंकर अपघाताचे प्रमाण वाढले असून याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमधून संतापाने व्यक्त करण्यात येत आहे
दरम्यान घडलेली घटना अशी काल पाच वाजता राहुरी शहरातील भुजाडी पेट्रोल पंपा समोरून अजय हा तरुण कार सायकल वरून चालला असताना खड्डे चुकविण्याच्या नादात रोड खालीवर असल्यामुळे त्याची मोटार सायकल स्लिप होऊन तो साईटला जाऊन जोरात नाल्यामध्ये पडला त्यानंतर तेथे असलेले छावा संघटनेचे देवेंद्र लांबे व इतर फिटर तरुणांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली 108 कॉल केला असताना ॲम्बुलन्स उपलब्ध होऊ शकली नाही नंतर शिवाज्ञा ही खाजगी ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्यानंतर दवाखान्यात नेईपर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता दरम्यान यावेळी देवेंद्र लांबे यांनी राहुरी पोलीस स्टेशनला ४ वाजता लँडलाईन वर फोन केला असता पोलीस घटनास्थळी अजिबात फिरकले सुद्धा नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे नागरिकांमधून एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे हा नगर मनमाड रस्ता अजून किती बळी घेणार हा नागरिकांचा संतप्त सवाल प्रशासनाला करण्यात येत आहे.
या घटनेवरून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन नगर मनमाड रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी आहे दरम्यान ही घटना घडल्यानंतर या रस्त्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात येणार असल्याची नागरिकांमधून चर्चा आहे. यावेळी पोलीस प्रशासना मधून सुद्धा या व्यक्तीच्या मदतीला कोणी आले नाही त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सदरील तरुण हा राहुरी नांदूर रस्त्यावरील येवले मळ्यात राहत असल्याची समजते व त्याची घरची परिस्थिती नाजूक असल्याची नागरिकांमधून चर्चा होत होती,
Leave a reply