Disha Shakti

Uncategorized

अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांन समवेत नामदार आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत साहेब यांची बैठक संपन्न

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी/ विजय कानडे :  अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांन समवेत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तसेच धाराशिव जिल्हा पालक मंत्री माननीय श्री प्रा. तानाजी सावंत साहेब यांची सदिच्छा भेट.पुणे.कात्रज येथे कुंभार समाजातील श्री क्षेत्र तेर संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर परिसरात विविध प्रकारचे विकास कामे संदर्भात चर्चा झाली. कुंभार समाजाचा जिव्हाळ्याचा विषय माती उतख्तनं, हरित लवाद ,पर्यावरण संदर्भात चर्चा झाली. कुंभार समाज्याच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तसेच मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करणे संदर्भात वेळ घेण्याविषयी चर्चा झाली.लवकरच दसरा मेळावा नंतर भेटीची वेळ घेऊ.

सदर भेटी संदर्भात पुढील मान्यवर उपस्थित होते. श्री श्यामशेठ राजे , श्री दत्ताजी कुंभार डाळजकर, श्री किसनराव काळे उपाध्यक्ष, श्री नागनाथ कुंभार उपाध्यक्ष, श्री नथुशेठ पिरंगुटकर पुणे जिल्हा अध्यक्ष, श्री महादेव खटावकर उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष, श्री मयुर जी कुंभार पुणे युवकाध्यक्ष,श्री मारुती कुंभार,श्री अशोकराव भिगवंनकर उपाध्यक्ष पुणे,श्री शिवहार कुंभार वाशी तालुका,श्री काका पोळ तेरखेड उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!