Disha Shakti

Uncategorized

तेर ग्रामपंचायत अंतर्गत अतिक्रमण केलेली घर पाडण्यासाठी माजी सरपंचाचे अमरण उपोषण

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : तेर ग्रामपंचायत अंतर्गत 40 वर्षापासुन एकहाती सत्ता असलेल्या डाॕ.पद्मसिंह पाटलांच्या तेर गावात 2017 साली ओपनच्या जागेवर कुंभार समाजाची अवघे 3 ते 4 घरे असणार्या कुंभार समाजाच्या महादेव उर्फ मुन्ना खटावकर यांनी पद्माकर फंड यांना पाडुन जनतेतुन सरपंच निवडुन येण्याचा पहिला मान मिळवला होता. पद्माकर फंड व रविराज चौगुले यांनी 2018 रोजी जिल्हाधिकारी ? धाराशिव यांच्याकडे महादेव खटावकर यांनी गट क्र .1148 मध्ये 700 स्वेअर फुट अतिक्रमण करुन बांधकाम केल्याची लेखी तक्रार केली होती .त्याअनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमेंनी खटावकर यांना सरपंच पदावरून अपाञ केले होते .त्या विरोधात खटावकर यांनी छञपती संभाजीनगर हायकोर्टात दाद मागितली होती.

हायकोर्टाने भुमीअभिलेख धाराशिव यांच्या मोजणी अहवालानुसार अतिक्रमण दिसुन येत नसल्या कारणाने परत हे प्रकरण जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे वर्ग करुन हे प्रकरण 15 दिवसात निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले होते .त्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी परत माजी सरपंच खटावकर यांना अतिक्रमणाच्या मुद्यावरून अपाञ केले . पण राजकिय दबावाखाली अपाञतेची कारवाई केल्याचा खटावकरांचा आरोप आहे म्हणून खटावकर यांनी 100 रुपायेच्या स्टँम्पवर नोटरी करुन माझे अतिक्रमण असलेले घर पाडावे , नाहीतर मि दि .10 आॕक्टोंबर पासुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यास बसणार आहे. अशी लेखी तक्रार दिली होती . त्याअनुषंगाने खटावकर अमरण उपोषनाला बसले आहेत .


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!