Disha Shakti

Uncategorized

राहाता तालुक्यातील शेतकऱ्याला पीक विम्याचे मिळाले गुंठ्याला मिळाले फक्त 5 रुपये!

Spread the love

राहाता प्रतिनिधी / दीपक सोलाट :- 02 नोव्हेंबर , राज्यातील शेतकरी आस्मानी संकटाचा सामना करत असताना आता सुलतानी संकटानेही पुरता मोडकळीस आला आहे. राहाता तालुक्यातील शेतकरी बाबुराव गमे यांनी आपल्या साडेसहा एकरावरील सोयाबिनसाठी उतरवलेल्या विम्याच्या नुकसान भरपाई पोटी गुंठ्याला अवघे पाच रूपये विमा कंपनीने दिले आहे. दरम्यान यावर सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने विमा कंपन्या आपला मनमानी कारभार करत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत शेतकरी नाराज झाला आहे.

विमा कंपन्या शेतकऱ्यांची चेष्टा करत असून सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. केलवड येथील बाबुराव गमे यांनी 260 गुंठे जमीनीवर असलेल्या सोयाबीनसाठी तीन हजार रूपये विमा भरला होता. अतिवृष्टीने 100 टक्के नुकसान झालेले असताना विमा कंपनीने अवघे 1406 रूपये म्हणजे गुंठ्याला अवघे पाच रूपये नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली आहे. अनेकांना तर काहीच नुकसान भरपाई मिळाली नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!