Disha Shakti

Uncategorized

दौंड तालुक्यातील बोरीभडक येथील वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या जॉली लॉजवर पोलिसांची धडक कारवाई

Spread the love

दौंड प्रतिनिधीं / किरण थोरात : दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर हायवे लागत असलेल्या बोरीभड (चांदण वाडी) येथील जॉली लॉजवरती यवत पोलिसांनी धडक कारवाई केली असून या लॉज वरती महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या लॉज चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . (दि.४) गुरुवारी यवत पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. यामध्ये लॉज चालक प्रभाकर गुलाब मदने (रा.भोसरी,मु.राहणार उमरगा, जि .उस्मानाबाद ) व उमेश शिंदे (रा.उरुळी कांचन) या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉजची झडती घेतली असता एकूण ९० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली .


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!