Disha Shakti

Uncategorizedइतर

माळवाडी (बोटा) येथील श्री स्वामी समर्थ औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्ष पदविका विभागातील विद्यार्थ्यांची सिन्नर येथील थील फार्मासुटिकल कंपनीला भेट

Spread the love

प्रतिनिधी /प्रमोद डफळ : दि. १७/०११/२०२२ रोजी श्री स्वामी समर्थ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्ष पदविका विभागातील विद्यार्थांनी औषधनिर्माता मध्ये लोकप्रिय असलेल्या रेवे फार्मासुटिकल प्रा. लि. सिन्नर, नाशिक येथील कंपनीला भेट देऊन त्यांची उत्पादन पद्धती बद्दल माहिती घेतली. यावेळी निखिल सोनवणे सर यांनी मुलांसमोर यशस्वी उद्योजक व कंपनीतील प्रक्रिये बदद्ल संपूर्ण माहिती दिली. तसेच महाविद्यालय आणि कंपनी यांनी दोघांमध्ये सामंजस्य करार करून भविष्यात होणाऱ्या कंपनीतील भेटी आणि अतिथी व्याख्यान निश्चित केले.


सदर औषध निर्माण कंपनीच्या भेटीस प्रा. सागर एस. सांगळे, प्रा. कल्याणी डी वैद्य, प्रा. धंनजय डी. नरसाळे आणि प्रा. निलेश मा. चत्तर उपस्थित होते.या सामंजस्य कराराबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. शिवाजीराव पोखरकर साहेब, सचिव डॉ. अमित पोखरकर यांच्याकडून महाविद्यालयातील शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले..


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!