Disha Shakti

Uncategorized

पोलीस मित्र संघ कोल्हापूर च्या वतीने बिंदू चौक लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे महापरीनिर्वाण दिन साजरा

Spread the love

कोल्हापूर प्रतिनिधी / पोलीस मित्र संघ कोल्हापूरच्या वतीने कोल्हापूर बिंदू चौक येथे महापरीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन आज स्मृतिदिनानिमित्त भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला अधिकारी फौंडेशन कोल्हापूर अध्यक्ष मा. यश वर्धन सर, मा. विशाल पाटील ( समाज कल्याण) मा. सावंत मॅडम ( समाज कल्याण ) यांच्या हस्ते पुष्प हार वाहून वंदन करण्यात आले. जगातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तुत्वाने राज्य केले असे युगपुरुष, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, ज्ञानाचा अथांग सागर, परम पूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन. 6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय. 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यामुळंच या दिवसाला ‘महापरिनिर्वाण दिन’ किंवा ‘महापरिनिर्वाण दिवस’ म्हटलं जातं. महापरिनिर्वाणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 डिसेंबर रोजी मुंबईमधील दादरस्थित चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

महापरिनिर्वाण म्हणजे काय?
बौद्ध धममानुसार जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना व जिवनातील वेदनांपासून मुक्त होतो. जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. महापरिनिर्वाण म्हणजे मृत्युंनंतरचे निर्वाण होय. जिवनातील अनेक ईच्छा, आकांक्षा वासना यांपासून मुक्त, सर्वस्वाचा त्याग करुन मुक्त झालेला. अदभुत ज्ञानी असलेला व अहऀत पदासारखया उच्चतम पदापर्यंत पोहोचलेल्या प्रामुख्याने बुद्धत्त्व/ ज्ञान प्राप्त केलेल्या, ज्ञानी, शिलवान, त्यागी समाजशिल व्यक्तीस महापरिनिर्वाणाचि अनुभूती होते. महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक ‘बोधिसत्त्व’ मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात, व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. राजकीय नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात.तसेच आज महापरिनिर्वाण दिनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय जनशक्ती पार्टी कोल्हापूर यांच्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे (जातीव्यवस्थेचे निर्मूलन ) या पुस्तकाचे वाटप देखील करण्यात आले. उपस्थित अभिवादक – श्री. विठठल ठोंबरे पाटील पोलीस मित्र संघ संघटक महाराष्ट्र राज्य,श्री.तानाजी चव्हाण कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, सदस्य, धनाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!