प्रतिनिधी /प्रमोद डफळ : राहुरी: तालूक्यात घडलेल्या घटनेच्या प्रश्नावर विधान सभेत सोलापूर जिल्ह्य़ातील आमदार आवाज उठवतो. हे निश्चितच षडयंत्र असून आज पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची झालेली बदली ही चुकीची आहे आहे असे मत राहुरी तालूक्यातील सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे काही महिन्यापूर्वी धर्मांतराचे एक प्रकरण घडले होते. या प्रकरणी आज हिवाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील म्हाळशिरस तालूक्याचे भाजपा आमदार राम सातपूते यांनी सदर धर्मातर प्रकरणी आवाज उठवून राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी हलगर्जीपणा आणि दिरंगाई केल्याचा आरोप ठेवण्यात आला. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत १५ दिवसांत चौकशी केली जाईल. तोपर्यंत राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची आजच नियंत्रण कक्षात बदली करण्यात येईल. असं गृह खात्याचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत जाहीर केलंय.
पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची तडकाफडकी झालेली बदली ही चुकीची आहे. अशी तालूक्यात चर्चा सुरू असून उद्या दिनांक २४ डिसेंबर रोजी राहुरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर बाजार समिती समोर सर्वपक्षीयांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या आंदोलनात तालूक्यातील शाळा व महाविद्यालयीन तरूणी सामील होणार असल्याचे समजले आहे.पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची बदली रद्द न झाल्यास भविष्यात तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिला आहे.
राहुरीचे पोलीस निरिक्षक दराडे यांनी दहा महिन्यांच्या कालावधीत चांगले काम केले आहे. राहुरीची गुन्हेगारी आटोक्यात आणली इतरांनी आमच्या तालुक्यात नाक खुपसू नये. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची राहुरीतुन बदली केली तर येणाऱ्या काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेणार.
शिवसेना जिल्हाप्रमुख – रावसाहेब खेवरे
राहुरीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पो.नि. दराडे यांचे महत्त्वाची भूमिका आहे. जर असे घडत असेल तर यामुळे राहुरी तालुका बदनाम होत आहे. कधीही चुकीचे काम व गुन्हे दाखल केले नाही .काही समाजात वाद निर्माण करणाऱ्यांकडुन पोलिस अधिकाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणतात.यामुळे राजकीय बळ वापरुन कारवाई करुन त्रास देण्याचे काम केले आहे.
आरपीआय जिल्हाअध्यक्ष – सुरेंद्र थोरात
राहुरी तालुक्यात कायम आम्ही चळवळ चालवतो शेतकरी व सर्व सामान्य लोकांसाठी आंदोलन करत असतो. पण गेल्या वर्षभरात पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कधीही चूकीचे काम केले नाही. किंवा खोटे गुन्हे दाखल केले नाही. मात्र अधिवेशनात माळशिरसचे आ.राम सातपुते यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी झोपले का ? राजकीय सुडबूध्दीतुन हा प्रकार करण्यात आला आहे.
यामुळे आम्ही रस्त्यावर उतरत आहे. बदली थांबली नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन होणार आहे.शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष – रविंद्र मोरे
महाविद्यालयीन विद्यार्थीनी रास्ता रोको आंदोलनात :- राहुरी तालुक्यात कॉलेज विद्यार्थीच्या छेडछाडीचे प्रकार वाढले असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आक्रमक पवित्रा घेत. छेडछाड करणाऱ्या वृत्तीचा बिमोड करून मुलींना न्याय मिळवून दिला. आज दराडे यांची बदलीचे वृत्त समजताच कॉलेज विद्यार्थीनी वर्गातून संताप व्यक्त होत असून कॉलेजच्या विद्यार्थीनी उद्याच्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणार आहे.