Disha Shakti

Uncategorized

माणगंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडीच्यावतीने श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा व पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

Spread the love

प्रतिनिधी / सागर गाडेकर : माणगंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडी म्हसवड येथे श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रम अतिशय उत्साहात गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रा कोकरे साहेब फलटण ,माण तालुका शिक्षण विस्तार अधिकारी श्री लक्ष्मण पिसे साहेब, शासकीय औद्योगीक संस्था दहिवडीचे प्राचार्य मा.डि वाय ओंबासे साहेब , माणदेशी फौडेशन चे करण चेतना विजय सिंन्हा, प्रसिद्ध सर्जन डॉ टी जी राऊत सर, केंद्र प्रमुख बाळासाहेब पवार साहेब,ज्ञानवर्धिनी हायस्कूल व जुनियर कॉलेज चे प्राचार्य जी डी मासाळ सर, डॉ सूर्यकांत कुंभार, डॉ तोरो सर, डॉ. ओंबासे सर, साखरे गुरुजी , संस्था उपाध्यक्ष सुखदेव मासाळ, अध्यक्ष डॉ वसंत मासाळ ,सचिव नारायण मासाळ, प्राचार्य सविता वसंत मासाळ उपस्थित होते. प्राचार्य ओम्बासे साहेब यांनी श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त गाडगे महाराज यांच्या जीवनावर आधारीत माहिती दिली, संस्थेमध्ये सूरू असणाऱ्या इंग्लिश मिडीयम स्कूल व pamedical कॉलेज विभाग माध्यमातून DMLT व radiology technician या व्यवसाय प्रशिक्षण कोर्स पूर्ण झालेले विध्यार्थ्यांना त्यांचा जीवनात झालेला बदल ,सुधारलेली आर्थिक परिस्थिती हि अतीशय गरजेची आणि अभिमानाची आहे. त्यांनी सांगितले. जस्तीत जास्त व्यवसाय शिक्षणं घेण्याकरिता विध्यार्थ्यांना संबोधित केले.

करण सिन्हा यांनी खेड्यातील जीवन व शहरी जीवन यातील अनेक फरक सांगितले, मासाळवाडीतील संकुलाचे प्रयत्न अतीशय सुंदर आहेत, व्यवसाय शिक्षण व शालेय शिक्षण दोन्ही गोष्टी एकाच संकुलात मुलांना शिकायला मिळत आहेत, अश्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान केले. संकुलाचे मनापासुन कौतुक करून येथील संस्था अध्यक्ष डॉ वसंत मासाळ व त्यांचे सर्व सहकारीसर्व शिक्षकयांचे मनापासुन अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना आजच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि विकास या विषयी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. जी डी मासाळ यांनीही मुलांना पालकांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्राचार्य रावसाहेब मासाळ सर, ढेंबरे मॅडम, करमाळकर मॅडम, व सर्वच शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विध्यार्थ्यांना पारितोषिकं देन्यात आली. सर्व विभागांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले, अतीशय सुंदर कार्यक्रम सादर केले. माजी नगरसेवक कृष्णदेव मदने यांनी सर्व मुलांना भोजन व्यवस्था केली. खूप मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!