अहमदनगर प्रतिनिधी / शेख युनुस : राहुरी शहरातील माजी राज्य मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात युवा नेते हर्ष तनपूरे यांनी राहुरी तालुक्यातील पत्रकार बंधूंचा सत्कार केला. पत्रकार बंधूंनी धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घ्यावी असे आपले मत स्पष्ट करत म्हटले की,लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा पत्रकार असून लोकसमाजाच्या जडणघडणीत पत्रकार हे महत्वाची भुमीका बजावत असतात.निपक्ष,निर्भिडपणे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सक्षम राहुन आपली जबाबदारी कर्तव्य बजावत असताना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध असतात.
आपल्या जडणघडणीत पत्रकार यांचा लाख मोलाचे सहभाग असल्याबाबत कृतज्ञता व्यक्त करत पत्रकारांचा आदर सन्मान केला.यावेळी उपस्थित माजी नगरसेवक नंदकुमार तनपूरे,बाळासाहेब उंडे,संतोष आघाव,महैश उदावंत,आदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत राहुरी शहरातील व तालुक्यातील पत्रकारांचा गौरव सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला.