प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : जळगाव येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्याकडून कौटुंबिक न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक (वर्ग ३) श्री.हेमंत दत्तात्रय बडगुजर,वय:५७ रा.इंद्रप्रस्थ नगर,शिवाजी नगर जवळ,जळगाव, ता.जि.जळगाव. यांनी तक्रारदार यांच्याकडे कौटुंबिक न्यायालयातर्फे देण्यात आलेल्या आदेशात खावटीची रक्कम रु ८५,०००/- एकरकमी जमा करण्याकरिता व तारीख वाढवून देण्याच्या मोबदल्यात २००/- रु लाच मागितली होती. सहाय्यक अधीक्षक यांना तक्रारदार यांच्याकडून २००/- रु लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडून कार्यवाही करून सहाय्यक अधीक्षकास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
सदर कार्यवाही १} मा.श्रीमती. शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक. २)श्री.एन.एस.न्याहळदे साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र,नाशिक ३} श्री.नरेंद्र पवार साहेब, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र,नाशिक, व श्री.शशिकांत पाटील (पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि. जळगाव),पी.आय.संजोग बच्छाव, पी.आय.एन.एन.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
महिला.पो.हे.काॅ.शैला धनगर, पो.ना.ईश्वर धनगर, पो.काॅ.राकेश दुसाने, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.काॅ.सुनिल पाटील, पो.हे.काॅ.रवींद्र घुगे, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळू मराठे, पो.काॅ.सचिन चाटे, पो.काॅ.प्रणेश ठाकूर, पो.काॅ.अमोल सुर्यवंशी याच्यां पथकाने कार्यवाही केली आहे.त्यांचे वर जिल्हा पेठ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
Leave a reply