कोल्हापूर प्रतिनिधी / विशाल पाटील : नेहरू युवा केंद्र कोल्हापूर व उर्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था खुपीरे यांच्या संयुक्त विद्यमाने खुपीरे ता. करवीर (कोल्हापूर) गावामध्ये 26 ते 28 फेब्रुवारी असे तीन दिवसीय श्रमदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होत आहे.
नेहरू युवा केंद्र कोल्हापूर मार्फत कोल्हापूर जिह्यामध्ये आरोग्य, स्वछता, जलजागरण, तसेच शासनाच्या विविध योजनांची जनजागृती चे कार्यक्रम तसेच युवकांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध तालुकास्तर, जिल्हास्तर स्पर्धा आयोजित केल्या जातात.युवकांमधील स्वयंसेवक तयार करून युवा मंडळाच्या माध्यमातून गावामधील मूलभूत प्रश्न सोडव ण्यासाठी ग्रामपंचायत च्या सहकार्यातून प्रयत्न करणे व गावच्या विकासामध्ये थोडासा हातभार लागणे ही उद्दिष्टे ठेऊन हा श्रमदानचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सदर शिबिरामध्ये स्वछता मोहीम, वृक्षारोपण तसेच सर्वांच्या सहकार्यातून शाळेतील मुतारी ची डागडुजी व रंगकाम करण्यात येणार आहे. जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे तसेच स्वछता, जल जागरण संदेश वॉल पेंटिंग च्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
विद्यामंदिर खुपीरे ता- करवीर कोल्हापूर येथे शिबिरासाठी जिल्हा परिषद कोल्हापूर चे माजी अध्यक्ष श्री. राहुल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,गावातील विविध संस्थांनाचे पदाधिकारी तसेच नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम सहाय्य्क गणेश भोसले,समन्व्यक अमित हुजरे, नितीन भोसले तसेच उर्मी संस्थेचे सदस्य श्री. सुमित हुजरे, धनाजी हुजरे, संदीप पाटील नलवडे, लखन गुरव, आदित्य हुजरे,अक्षय पाटील, प्रवीण पाटील,हरी ओम सर, माळी सर उपस्तिथ होते तसेच गावातील होतकरू, सामाजिक जाणीव असलेला युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
माननीय श्री. राहुल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण ला सुरुवात झाली. सदर कार्यक्रमासाठी गावातील युवकांचा चांगला सहभाग मिळाला. सामाईक प्रयत्नांनातून अशीच भरीव कामगिरीची आणि मदतीची अपेक्षा नेहरू युवा केंद्रा मार्फत जिल्हा युवा अधिकारी मिस पूजा सैनी यांनी व्यक्त केली .शिबिरामध्ये सहभागी युवक युवतीना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.
HomeUncategorizedकोल्हापूर करवीर तालुक्यातील खुपीरे गावात उर्मी सेवाभावी संस्थेतर्फे ३ दिवसीय श्रमदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम
कोल्हापूर करवीर तालुक्यातील खुपीरे गावात उर्मी सेवाभावी संस्थेतर्फे ३ दिवसीय श्रमदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम

0Share