धाराशीव प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव तालुक्यातील तेर येथे कै.डाॅ.चंद्रकलादेवी पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मृती सन्मान पुरस्कार व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शंभर मिटर धावणे स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण कार्यक्रम प्रसंगी खोत बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.बेदरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विजयकुमार लाड,सरपंच दिदि काळे, उपसरपंच श्रीमंत फंड,तेर सोसायटीचे चेअरमन सतिष कदम,रुग्न कल्याण समितीचे सदस्य जुनेद मोमीन,एम.एच.डब्लू चे संचालक प्रविण साळुंके, क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे,माजी उपसरपंच मज्जित मनियार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कै.डाॅ.चंद्रकलादेवी पाटील स्मृती सन्मान पुरस्कार सौ.प्रतिभा जगदाळे यांच्या वतीने ऐ.बी.लोमटे यांनी स्विकारला.तर शंभर मिटर धावणे स्पर्धेतील विजेते प्रथम अमन शेख, द्वितीय प्रथमेश यादव, तृतीय प्रेम कोळगे यांना उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक संयोजक नरहरी बडवे यांनी केले तर सूत्रसंचालन नवनाथ पांचाळ यांनी केले तर आभार एस.एस.बळवंतराव यांनी मानले.
मानपत्राचे वाचन एस.यू गोडगे यांनी केले.यावेळी संजय लोमटे,प्रा.सूर्यकांत कटींग,एम.एन.शितोळे, महादेव,भंडारे, जे.बी.बोराडे, एल.टी.चव्हाण,एम.डी.नरसिंगे, अनिता रणदिवे,गोरख माळी ,सोनटक्के, विद्यार्थी, विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.
Leave a reply