धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : – जेष्ठ नागरिक यांनी पुढील आयुष्य सुखमय होण्यासाठी आनंदाचे वर्तुळ निर्माण करावे असे आवाहन दक्षिण मराठवाडा अंतर्गत जेष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष बी.आर.पाटील यांनी केले. दक्षिण मराठवाडा अंतर्गत जेष्ठ नागरिक महासंघाचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आंधळे यांनी धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिर याठिकाणी आयोजित केलेल्या मार्गदर्शन मेळावा कार्यक्रमप्रसंगी बी.आर. पाटील बोलत होते. यावेळी ह.भ.प.दिपक महाराज खरात, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी, महासंघाचे सचिव प्रभाकर कापसे, जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज अडसूळ, जिल्हा सचिव अच्युतराव माने, डॉ.आर.आर. भांगडीया यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला यांच्या वतीने “जीवन गौरव” पुरस्कार मिळाल्याबद्दल डी.के.कुलकर्णी यांचा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ह.भ.प.दिपक महाराज खरात,ह.भ.प.महादेव महाराज अडसूळ, महासंघाचे सचिव प्रभाकर कापसे, माधवसिंग राजपूत यांनी आपले विचार व्यक्त केले. आभार विजय गायकवाड यांनी मानले.यावेळी तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर,बाशीद काझी, सिद्राम सलगर,कल्याण आंधळे, नारायण साळुंके, व्यंकट माळी, तानाजी नाईकवाडी, साहेबराव सौदागर,किसन कांबळे, रामकृष्ण भोरे , शिवाजी ढेकणे, राजेंद्र उंबरे, सतिष पाटील, अंबादास जोशी,संदिपान जाधव, विजयसिंह चंदिले व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डी.के.कुलकर्णी यांचा सत्कार करताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी.यावेळी बी.आर.पाटील ,राजाभाऊ आंधळे, महादेव खटावकर, महादेव महाराज अडसूळ उपस्थीत होते.
Leave a reply