Disha Shakti

Uncategorized

चिखलठाण येथील वनविभागाच्या प्रक्षेत्रास आग लावल्या प्रकरणी आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी

Spread the love

प्रतिनिधी / अशोक मंडलिक : राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथील वनविभागाच्या राखीव वनक्षेत्र फॉरेस्ट गट नंबर 60 मध्ये वनसंरक्षक गस्ती घालत असतान दुसरे वर्ष रोपवनात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे वनसंरक्षकास आढळले असता त्यांनी स्थानिक वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलवले व आग लागलेल्या ठिकाणी एक इसम सजन हिरामण शेख हा आढळला असता त्याची वनरक्षकांनी झडती घेतली असता त्या इसमाकडे आगपेटी सापडली व आरोपी सजन हिरामण शेख याची चौकशी केली असता सदरील आरोपीने वन विभागाच्या राखीव वनक्षेत्र फॉरेस्ट गट नंबर 60 मध्ये आग लावल्याचे कबूल केले त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी वनक्षेञपाल-वाय.जे.पाचरणे सो. यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल श्री.रोकडे सो,श्री.शेंडगे सो,श्री.रायकर , वनरक्षक, श्री.कोळी, श्री.गाडेकर , श्री.घोडसरे , श्री.चव्हाण श्री.खेमनर , श्री.जाधव ,वनकर्मचारी श्री.वायाळ, वाहन चालक श्री.ताराचंद गायकवाड व स्थानीक ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली

या भीषण आगीमुळे दुसरे वर्ष रोपवनातील 5 हेक्टर वनक्षेत्रातील गवत व पालापाचोळा व रोपे जैवसंपदाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आह़े. सदरील आरोपीची चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आह़े.सदरील आरोपीस पुढील चौकशीसाठी राहुरी वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले व चौकशी करून राहुरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आह़े. सदरील आरोपीस दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. व आरोपीस कोर्टात हजर केले असता कोर्टाने सदरील आरोपीस दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आह


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!