Disha Shakti

Uncategorized

साकूर येथे चोरट्यांचा सुळसुळाट! बोलेरो गाडी चोरीला गेली

Spread the love

संगमनेर प्रतिनिधी / युनूस शेख : संगमनेर तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून त्यांनी आत्ता चार चाकी वाहनाकडे चोरीचा मार्ग वळवळत पोलीसांना आव्हान केल्याचे दिसत आहे. सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यात चोरांनी घरफोडी, रस्ता लुट, दुकानलूटून, तसेच पेट्रोल पंप लूटून पोबारा केला होता. पोलीस प्रशासनाच्या कठोर परिश्रमाने काही चोर जेरबंद झाले आहेत तर काही मोकाट असल्याने ह्या घटना घडत असल्याचे नागरिकांमध्ये भीतीचे वातारण पसरले आहे.

साकूर येथील रहिवासी असलेले नाजीम मोहम्मद राजे यांच्या मालकीची सुमारे 3 लाख किंमतीची महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. बुधवार दि. 8 मार्चला सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आले कि बोलेरो गाडी चोरीला गेली. नाजीम राजे हे आपल्या कुटुंबीयांसोबत पटेल गल्ली साकूर येथे वास्तव्यास आहे. गेल्या 3 महिन्यांपुर्वी त्यांनी संगमनेर येथून महिंद्रा कंपनी ची बोलेरो प्लस गाडी क्रमांक एम.एच.15.सी.डी. 7891 ही गाडी विकत घेतली होती. गाडी ते आपल्या कौटुंबिक कामासाठी वापरत होते.

मंगळवारी दिनांक 7 मार्चला सकाळी 8 च्या सुमारास कामासाठी गाडी घेऊन गेले नंतर दिवसभर कामकाज आटपून ते आपल्या घरी बोलेरो घेऊन पुन्हा 8.30 ला घरी परतले.बोलेरो घरासमोरच पार्कींग करून बडी रात असल्याने ते मज्जिदमध्ये नमाज पठण करायला गेले. नमाज पठणकरुन ते रात्री 12.16 वाजेच्या दरम्यान आपल्या घरी आले असता बोलेरो घरासमोरच उभी होती,परंतू सकाळी म्हणजेच बुधवारी दिनांक 8 मार्चला 7 च्या दरम्यान बोलेरो दिसत नसल्यामुळे त्यांनी साकूर गावात व पंचक्रोशीत शोधाशोध केली परंतु बोलेरो गाडी कुठेही आढळून आली नाही.या घटनेबाबत नाजीम मोहम्मद राजे यांनी घारगांव पोलीस स्टेशनला धाव घेत अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करत बोलेरो गाडी सापडण्याची विनंती केली. पुढील तपास घारगांव पोलीस करत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!