प्रतिनिधी / युनुस शेख : अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री व माजी आमदार शिवाजीराव कर्डीले निवडून आले आहेत. भाजपचे शिवाजीराव कर्डिले साहेब व महाविकास आघाडीचे चंद्रशेखर घुले यांच्यात लढत होऊन शिवाजीराव कर्डिले हे विजय झाले आहेत.शिवाजीराव कर्डिले यांच्या जिल्हा बँकेच्या विजयामागे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटिल आणि खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे.माजी मंत्री व आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयाबरोबरच कांग्रेसी नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असलेली बैंक आता महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे म्हणजेच भाजपाच्या ताब्यात गेली असल्याचे स्पष्ट होत आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणूकीच्या अध्यक्षपदी शेवटच्या दिवशी भाजपतर्फे शिवाजीराव कर्डिले यांचा अर्ज दाखल करण्यात आल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आणि अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडणूक अटीतटीची होणार असल्याने काट्याची कुस्ती होऊन खऱ्या पैलवानाने समोरील विरोधक चितपट करत बाजी मारली. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व विखे पाटील पिता पुत्राने ही जिल्हा बँक निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयाचे गणित जुळवून विजय मिळवला. अहमदनगर जिल्हा बँक अध्यक्ष पदाची निवडणूक ही मतदानाद्वारे पार पाडण्यात आली.शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयाने अहमदनगर जिल्ह्यातून शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
Leave a reply