Disha Shakti

Uncategorized

खडांबे बु.॥ शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न..!!

Spread the love

दिशा शक्ती प्रतिनिधी/  दिपक हरिश्चंद्रे : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडांबे बु.॥ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने भारावून गेलेल्या पालक व ग्रामस्थांनी बक्षीस म्हणून ५७०००/- रूपये शाळेला दिले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, धार्मिक, विनोदी गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी वर्षभरात विविध स्पर्धेत मिळवलेल्या प्रशस्तीपत्रकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वांबोरी बीटचे शिक्षणविस्तार अधिकारी श्री. अर्जूनराव गारूडकर साहेब यांनी भूषविले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सडे केंद्रप्रमुख श्री. रविंद्र थोरात साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी थोरात साहेबांनी सादर केलेल्या ‘आई’ या कवितेने उपस्थितांचे डोळे पाणावले.

यावेळी सरपंच कैलास पवार, उपसरपंच सौ. विजयाताई लांडगे, ग्रा.पं.सदस्य श्री. बाळासाहेब पवार, सौ. शितल कैलास ताकटे, सौ. भाग्यश्री यशवंत ताकटे, सौ. कुंदा रामदास जठार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सम्राट लांडगे, उपाध्यक्षा सौ. दिपाली मिननाथ वैद्य, सौ. मथुराबाई गायके, सौ.महानंदा पवार, सौ. शारदा थोरात, चेअरमन श्री. अमोल पवार, सो.संचालक श्री. बाबासाहेब तांबे, श्री. मारूती गायके, श्री. रावसाहेब पवार, माजी सरपंच श्री. यशवंत ताकटे, अॅड. सुरेशराव ताकटे, श्री. सुनील तांबे, श्री. पंकज पवार सर आदींसह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. रावसाहेब जाधव, अनिल कल्हापुरे, दिपक भालेराव, अनिल थोरात, भाऊसाहेब तांबे, विकास थोरात, दिनेश मदने, दिपक लांडगे, किशोर कोळगे, विश्वजीत ताकटे,आबासाहेब ताकटे,योगेश साळे यांनी विशेष परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांना नृत्य शिकविण्यासाठी सौ. वर्षा शिरसाठ व कु. कोमल गायके यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. विनायक पानसंबळ सर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. अर्चना बेलदार मॅडम यांनी तर आभार प्रविण बेलदार यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!