Disha Shakti

Uncategorized

स्व.अशोकराव ( आबा) पाटील खेमनर यांची जयंतीनिमित्त अभिवादन व रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न

Spread the love

अ.नगर जिल्हा प्रतिनिधी / शेख युनुस : संगमनेर तालुक्यातील पंचक्रोशीत गाजलेले आणि नावाजलेले गोर गरीबांचे कैवारी राजा म्हणजे आबा पाटील म्हणजेच स्व.अशोकराव बाजीराव पाटील खेमनर.आबांच्या अचानक पणे जग सोडून जाण्याने सर्वसामान्यांचा जीवनात पोकळी निर्माण होऊन पोरके झाल्याचे वाटत आहे. न्याय हक्कासाठी भांडणारा न्याय देवता हरपल्याने अंतकरणात भार मोठी दुःखद घडली आहे.

स्व.अशोकराव (आबा) पाटील खेमनर यांची गेल्या पाच वर्षापासून जयंती साजरी करण्यात येते. ‌ स्व.अशोकराव (आबा) पाटील यांचा पुर्वी परिस्थिती पाहिली तर आबांचा वाढदिवस साजरा करण्याचा आनंद आगळा वेगळाच असायचा 2017 साली आबा जग सोडून गेले .आबा हे आपल्या मित्रपरिवार व कुटुंबाला नेहमी सांगायचे कि,चांगले काम व योग्य काम केल्याने बळ मिळते.नेहमी खरे बोला,हक्कासाठी लढा ,गोर गरीबांना मदत करा आणि योग्य न्याय करा असे आबा पाटील नेहमी सांगत होते. ‌ स्व.अशोकराव (आबा) पाटील खेमनर यांची जयंतीनिमित्त मातोश्री हॉस्पीटल येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला. तत्पुर्वी स्व.अशोकराव (आबांच्या) प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. साकूर पठार पंचक्रोशीतील शाळेतील परिसरात,मंदिरातील परिसरात साफसफाई करून शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. ‌

‌ यावेळी उपस्थित साकूर पठार भागचे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पाटील खेमनर, संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर, साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजित पाटील खेमनर, महादु पाटील खेमनर,भाऊसाहेब सागर, मुळाखोरे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठूराज मैड साहेब, विजयशेठ फिरोदिया, भाई भाई रोपवाटिका अल्लीभाई मोमीन,भैय्याभाई शेख, निसारभाई पटेल, नामदेव खेमनर, अँड. अशोकराव हजारे,चांगदेव खेमनर,आदी कार्यकर्ते व साकूर पंचक्रोशीतील जनसमुदाय विद्याप्रबोधनी शाळेतील कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी पालकवर्ग आणि आबांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. ‌ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रविण मिसाळ यांनी केले तर आभार हेमचंद्र होळकर यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!