अ. नगर प्रतिनिधी / शेख युनूस : राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील डोंगराळ दुर्गम क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेत 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिनाची स्थापना करण्यात आली. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वतंत्र मिळाले मात्र महाराष्ट्र स्वतत्र नव्हता, भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्ण पणे वेगळा होता. हळूहळू देशातील राज्ये, भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि तेव्हा पासून 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो.मंगल देशा, पवित्र देशा,कणखर देशा,दगडा च्या देशा,नाजूक देशा, फुलांच्या देशाची स्थापना ही तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्त रोवली गेली.महाराष्ट्र दिना सोबतच हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात जन जागृतीचे काम केले. कामगारांना अल्प मजुरीच्या बदल्यात 12 ते 24 तास कामे करून घेतले जात होते, या विरोधात सर्व कामगारांनी एकत्र आंदोलन केले. तेव्ह्यापासून 1 मे रोजी कामगार दिन दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला. शेरी चिखलठाण येथील जिल्हा परिषद शाळेत 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला असून महाराष्ट्र दिनाची सविस्तर माहिती शिक्षकांनी दिली.
या वेळी उपस्थित मुख्याधपाक रोडे सर, वायळ सर,काकडे चांगदेव, दुधावडे सर,शिक्षक गाडेकर सर,काकडे सर, नरवडे मॅडम, बार्वे सर, बाचकर सर, सरोकते सर, तसेच शेरी अंगणवाडी शेख बिस्मिल्ला, काकडे मंगल, व अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी शेख युनूस, आणि विठ्ठल निवृत्ती काकडे, एकनाथ काकडे,पालक वर्ग, विध्यार्थी उपस्थित होते.
Leave a reply