Disha Shakti

सामाजिक

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पुतळ्याची शौर्ययात्रे पूर्वीं भव्य व दिव्य मिरवणूक संपन्न

Spread the love

पुणे प्रतिनिधी /भारत कवितके : पुणे येथील सारसबाग जवळ खंडोबाचे मंदिर समोर स्वारगेट येथे रविवार दिनांक ७ मे २०२३ रोजी सायंकाळी शौर्ययात्रेपूर्वी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पुतळ्याची भव्य व दिव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी दोन वाजलेपासूनच या ठिकाणीं महाराष्ट्र मधून समाज बांधव (महिला व पुरुष) येऊ लागले. पिवळ्या धमक भंडार्याने रस्ते पिवळे धम्मक झाले,” महाराजा यशवंतराव होळकर यांचा विजय असो” ” येळकोट येळकोट जय मल्हार ” अशा घोषणानी सारा परिसर दणाणून सोडला. १२ फुटी घोड्यावर स्वार हातात धारदार तलवार घेतलेल्या महाराजा यशवंतराव होळकर यांचा पुतळा दिमाखात खंडोबा मंदिरा समोर सर्वांच्या नजरेत भरत होता.

लेझीम,घोडे,रथ,घोडेस्वार महिला,गजीनृत्य पथक,व धनगर समाजातील महाराष्ट्र मधून व इंदौर येथून आलेल्या समाज बांधवांनी सारा परिसर गजबजून गेला होता. समाजातील वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळे नेते, पदाधिकारी, या प्रसंगी एकत्रीत आल्याचे जाणवत होते. तर काही राजकीय नेते मंडळीने या शौर्ययात्रे कडे पाठफिरविली अशी चर्चा समाज बांधव करताना दिसत होते.

मिरवणूक पार पडल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.ढोल माशाच्या गजरात,फटाके वाजवित महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. व एका लघु पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपिठावरील मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

या प्रसंगी खासदार डा विकास महात्मे,दत्तामामा भरणे,प्रकाश आण्णा शेडगे,प्रा.लक्ष्मण हाके,संजय सोनवणी,रुपाली ठोंबरे,रेश्माताई हाके,घनश्याम हाके,स्वप्निल राजे होळकर, शिवाजी तरंगे पाटील, सुनिल धनगर,भारत कवितके, जयवंत कवितके, राजेंद्र गाडेकर, योगेश धरम,धनंजय तानळे,मुकुंद कुचेकर,ब अमरराजे बारगळ सर,आदि उपस्थित होते. व महाराजा यशवंतराव होळकर आयोजन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या वेळी विशेष परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!