Disha Shakti

इतर

संगमनेर तालुक्यात आता बिबट्याच्या अवयवांची तस्करी

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस :संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील बिबट्याचे अवयव विकणारी टोळीच्या वनविभागाने मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून बिबट्या मृगया या जातीच्या जनावराचे दात, सुळे, मिशा आशा पंचवीस अवयवांची खरेदी विक्री करताना दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे तर एक फरार झाला आहे. ही घटना शुक्रवार दि. 19 मे 2023 रोजी हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ रात्री 9:45 च्या सुमारास घडली. यात आरोपी श्रीराम यादव सरोदे (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर), सुधीर विजय भालेराव (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) हे अटक केले आहे तर सुशांत उत्तम भालेराव (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) हा फरार झाला आहे. तर संगमनेर भाग एकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी ही दमदार कामगिरी केली आहे. आता अटक केलेले आरोपी यांनी हे अवयव आणले कुटून. कुठल्या बिबट्याचे हे अवयव आहे. यामध्ये आणखी कोण-कोण आहेत. याची कसून चौकशी वनविभाग करत आहेत. याचा पुढील तपास उपविभागीय वन अधिकारी संदिप पाटील करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावातील तीन तरुण बिबट्याच्या अवयवांची तस्करी करत असल्याची माहिती वनविभागाचे अधिकारी सचिन लोंढे यांना लागली. त्यांनी यासाठी W. C. c. b यांच्या टीमच्या साहाय्याने एक पथक तयार केले. या पथकाने या चंदनापुरीतील तरुणांचा फोन नंबर शोधला.

आज दिनांक १९/०५/२०२३ रोजी गुप्त माहितीवरुन वन्यप्राणी बिबटचे मृगया चिन्ह, दात, सुळे, मिशा यांची खरेदी विक्री होणार असल्याची खब-यामार्फत गुप्त माहिती मिळाल्यावरुन बनावट ग्राहक बनुन यशस्वी सापळा रचण्यात आला. त्यानंतर वनगुन्हा क्र. WLP ०१/ २०२३-२४ दि. १९/०५/२०२३ च्या नोंद केला. गुन्हयात आरोपी नामे

१. श्रीराम यादव सरोदे वय ३४ वर्षे रा. चंदनापुरी (आनंदवाडी), ता. संगमनेर, जि. अहमदनगर. २. सुधिर विजय भालेराव वय ३० वर्षे रा. चंदनापुरी (आनंदवाडी), ता. संगमनेर, जि. अहमदनगर ३. ( फरार आरोपी) सुशांत उत्तम भालेराव रा. चंदनापुरी (आनंदवाडी), ता. संगमनेर, जि. अहमदनगर

आरोपी क्र. १ व २ यांच्याकडुन सदरचा मुद्देमाल खात्री करुन वरील आरोपीसह ताब्यात घेतला. सदर गुन्हयात एक आरोपी फरार आहे. सदर गुन्हयात पुढील तपास असुन वनगुन्हयाकामी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम सुधारणा २०२२, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ कलम २,९, ३९, ४४, ४८(A), ४९(B). ५०,५१,५२ अन्वये गुन्हा नोंद केला. पुढील तपास उपविभागीय वन अधिकारी संगमनेर श्री संदिप पाटील आणि उपवनसंरक्षक जुन्नर श्री अमोल सातपुते व श्री योगेश वरखड (भा.व.से) W.C.C.B. मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. वनपरिक्षेत्र संगमनेर भाग-१ चे श्री. सचिन लोंढे, वनविभाग जुन्नर व W.C.C.B यांची टिम, रईस मोमिन, संदिप येवले, कुणाल घुले, तन्मय बागल, हारुन सव्यद, विक्रांत बुरांडे, अरुण देशमुख, गजानन पवार यांनी कार्यवाही केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!