Disha Shakti

Uncategorized

राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान स्पर्धेचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे आयोजन

Spread the love

तिफण-2023 चे आयोजन

प्रतिनिधी प्रमोद डफळ 

राहुरी विद्यापीठ, दि. 1 जून, 2023

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफण-2023 या कृषि यंत्रे विकसीत करण्याच्या स्पर्धेचे महात्मा फुले कृषि विद्यापीठात दिनांक 3-4 जून, 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून या स्पर्धेचा विषय ट्रॅक्टरचलीत किंवा स्वयंचलीत भाजीपाला पूर्नलागवड यंत्रे हा आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक संघ यंत्र डिझाईन करणे, तयार करणे आणि प्रत्यक्षात शेतामध्ये चालवणे, त्याचा विक्रीचा प्रस्ताव सादर करणे इ. कामे पूर्ण करणार आहे. जिंकणार्या 3 संघास भरघोस रोख रक्क्म बक्षीस म्हणुन मिळणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे हस्ते होणार आहे. या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कृषि अभियांत्रीकी शाखेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कार्यक्रमाचे समन्वयक महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक श्री. संजय देसाई, जॉन डिअरचे अधिकारी, सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्सचे अधिकारी उपस्थित असणार आहेत. या स्पर्धेच्या अंतिम फेरीची जबाबदारी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी यांचेकडे आहे.

सदर स्पर्धेसाठी देशातील एकुण 50 अभियांत्रिकी महाविद्यालयातून 16 महाविद्यालयांच्या संघाची अंतीम फेरीमध्ये निवड झालेली आहे. या अंतीम फेरीत 16 संघातील स्पर्धेसाठी एकुण 315 विद्यार्थी व विद्यार्थीनी आणि 25 पेक्षा जास्त मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कृषि यंत्रांची गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील 42 पंचांची नेमणूक करण्यात आलेले असून कृषि यांत्रिकीकरणाच्या क्षेत्रातील विविध कंपन्या आणि संस्थांचे 100 उच्चस्तरीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांनी दिली आहे .


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!