दौंड प्रतिनिधी / किरण थोरात : केडगाव व परिसरातील विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. दापोडी येथील महावितरण कंपनीवर मोर्चा नेणार असल्याचे लेखी निवेदन आज (ता. ८) रोजी महावितरणचे अभियंता राजेंद्र एडके याना देण्यात आले.भीमा नदीकाठी असणारे शेतीपंपास मोजुन दोन तासच विजपुरवठा दिला जात आहे. विद्युत प्रवाह कमी दाबाने येत असल्याने शेतीपंप निकामी होत आहे. एन उन्हाळ्यात महावितरणकडून होत असलेली शेतकर्यांची मुस्कटदाबी ही न भरून येणारी आर्थिक झळ कायमचीच झाली आहे.
उसाच्या आडसाली लागनी, तरकारी, उभी पिके, जनावरांची वैरण, बिबट्याचा वाढता वावर यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्याचे नुकसान होत आहे. सदर विजबिले वेळेत भरून देखील विजपुरवठा पूर्ण क्षमतेने दिला जात नाही. विजपुरवठा पूर्ण क्षमतेने व वेळेत मिळावा अन्यथा महावितरण कार्यालय दापोडी येथे (ता.१३) रोजी दौंड तालुक्याच्यावतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येइल अशा स्वरूपाचे लेखी निवेदन पारगाव येथील शेतकर्यानी महावितरण कंपनीला दिले आहे. यावेळी संभाजी ताकवने, सुभाष ताकवने, दत्तात्रय ताकवने, संपत ताकवने, उद्धव ताकवने, संदिप कोरेकर, संतोष ताकवने, राजेंद्र पोमन, राजेंद्र जगदाळे, किरण मोरे, रवि जगताप, अशोक भाडळे आदी शेतकरी उपस्थित होते.
Leave a reply