बिलोली प्रतिनिधी- साईनाथ गुडमलवार
दिनांक 11.06.2023 रोजी बिलोली तालुक्यातील मौजे केसराळी येथे राष्ट्रमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. जयंती मंडळाने ठेवलेल्या विचार मंथन कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, दीपक बाबुराव पाटील शिंदे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून, भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य तथा ओबीसीचे नेते, माणिकरावजी लोहगाव साहेब, व भाजपाचे सरचिटणीस मारोती गंगाधर राहीरे, प्राध्यापक बालाजीराव सिरगिरे सर, चळवळीतील कार्यकर्ते पिराजीराव राजुरे,साहेबराव चेट्टे मुगावकर, हे होते.
त्याप्रसंगी मल्लेश बरगे, केसरळीचे सरपंच राजेश्वर मंदरने, उपसरपंच, मारोतीराव मादाळे,दत्तात्रय पाटील माडे, मारुती पाटील सावळे, राम पाटील काळे, शंकरराव मुद्दलवार, साईकृष्णा काळे, सायलू पांचाळ,प्रवीण फकिरे, गोविंदराव सावळे, भूमा मुद्दलवार,गंगाराम लष्करे, सायबु मुद्दलवार, लक्ष्मण मुद्दलवार, शिवलिंग मुद्दलवार, मलबा लष्करे, अंबादास रावळकर, नागनाथ लष्करे, रमेश लष्करे, निरंजन मुद्दलवार, मलबा कटलरे,आनंद दिमलवाड, मलकु हांद्रे, प्रकाश लष्करे, गंगाधर मुद्दलवार, गावातील असंख्य महिला भगिनी व शाळेतील असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. श्री माणिकराव लोहगावे व प्राध्यापक श्री बालाजीराव शिरगिरे, श्री पिराजीराव राजुरे, श्री मारोती राहिरे, श्री बाळासाहेब चेट्टे यांनी विचार मंथन सभेत सुंदर असे मार्गदर्शन केले.. काही शालेय विद्यार्थिनीही आपले सुंदर मनोगत मांडले. मान्यवराच्या हस्ते सदर विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
श्री मारोती राहिरे यांनी कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी त्यांनी स्वतः लिहिलेले अहिल्या वंदना हे गीत गायले व उपस्थित सर्वांनी त्यांना टाळ्यांची दाद दिली. अध्यक्षीय समारोप श्री दीपक पाटील शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन श्री शिवलिंग मुद्दलवार, तर आभार प्रदर्शन श्री मलकु हांद्रे यांनी केले.
Leave a reply