Disha Shakti

सामाजिक

बालविद्या मंदिर राहुरी येथे पालक मेळावा संपन्न

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी शहरातील नावाजलेली शाळा बालविद्या मंदिर शाळेत आज दिनांक 24-6-2023 रोजी वार शनिवार वेळ सकाळी 8:00 वाजता बालविद्या मंदिर येथे पालक मेळावा संपन्न झाला.उन्हाळ्याची सुट्टी संपून 15 जूनला शाळा चालू झाल्या.त्यानंतर आज पहिली अ मध्ये दि.24 जून रोजी पालक मेळाव्यामध्ये बालविद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोरे सर तसेच पहिली वर्गातील वर्ग शिक्षक श्री.राठोड सर यांनी सर्व पालक व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी राठोड सरांनी बोलताना सांगितले की सकाळी मुलांना लवकर उठून आंघोळ करून शाळेचा गणवेश स्वच्छ असला पाहिजे त्यानंतर शाळा टायमिंग सकाळी 7 वाजून दहा मिनिटे ते दुपारी 12:00 पर्यंत राहील विद्यार्थी व विद्यार्थिनीना अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी असंख्य पालक पालक मेळाव्यासाठी उपस्थित होते. सर्व पालाकांनी आपल्या मुला मुलींचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सरांना पुर्णपणे मदत करु अशी इच्छा व्यक्त केली. राठोड सरांनी सर्व पालकांचे आभार मानले व पालक मेळावा संपन्नात पार पडला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!