उस्मानाबाद प्रतिनिधी / विजय कानडे : महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भालचंद्र चाटे यांचा बदली निमित्त रुक्मिणी मंगल कार्यालयात सोमवार दिनांक 10 जुलै रोजी महावितरण कर्मचारी, तेर ग्रामपंचायत व पत्रकारांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता रोहित जोगदंड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजाभाऊ वडणे, उपव्यवस्थापक नामदेव माळी, सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता हंबीरे यांची प्रमुख उपस्थिती होती.भालचंद्र चाटे यांनी एप्रिल 2016 ते जुलै २०२३ पर्यंत तेर उपविभागिय कार्यालयात उपकार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिले.
शांत, संयमी, कार्यतत्पर असे नावलौकिक असलेल्या चाटे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडवण्याचे काम केले. निरोप समारंभा निमित्त तेर ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच श्रीमंत फंड सदस्य अजित कदम, नवनाथ पसारे ,किशोर काळे ,बापू नाईकवाडी यांनी तर शाखा अभियंता सचिन चव्हाण, राहुल सावंत ,श्याम जाधव, शुभम मारवडकर कर्मचारी शहाजी पवार ,रवी भोरे , शरद मेंगले, नंदकिशोर मते, कुंभार, मनोज रुपनावर ,सुनील चुनगुने यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुदेश माळाळे व आभार श्याम जाधव यांनी मानले.
Leave a reply